ETV Bharat / state

सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या मोठ्या भावाला जन्मठेपाची शिक्षा - brother in thane

मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची घटना १२ ऑक्टोबर २०१७ रोजी भिवंडी शहरातील देवजीनगर परिसरात पहाटेच्या सुमारास घडली होती. शनिवारी या खुनाच्या गुन्ह्याची अंतिम सुनावणी होऊन जिल्हा प्रधान तथा जिल्हा सत्र वरिष्ठ न्यायधीश एस. आर. जोशी यांनी आरोपी मोठ्या भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

नारपोली पोलीस स्टेशन
सख्या भावाचा खून करणाऱ्या मोठ्या भावाला जन्मठेपाची शिक्षा
author img

By

Published : May 30, 2021, 5:49 PM IST

ठाणे - मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची घटना १२ ऑक्टोबर २०१७ रोजी भिवंडी शहरातील देवजीनगर परिसरात पहाटेच्या सुमारास घडली होती. त्यानंतर नारपोली पोलिसांनी मोठ्या भावाला आईच्या तक्ररीवरून अटक केली होती. शनिवारी या खुनाच्या गुन्ह्याची अंतिम सुनावणी होऊन जिल्हा प्रधान तथा जिल्हा सत्र वरिष्ठ न्यायधीश एस. आर. जोशी यांनी आरोपी मोठ्या भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुनील माने (३२) असे शिक्षा ठोठावलेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. तर आकाश माने (१९) असे खून झालेल्या लहान भावाचे नाव आहे.

काय घडलं 'त्या' दिवशी?
भिवंडी शहरातील देवाजीनगर भागात कौशल्या माने आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांना मृत आकाश (१९) आणि सुनील (३२) अशी दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे लग्न झाले असून दोन नातवंडेही त्यांना आहेत. मृत आकाशला दारूचे व्यसन होते. तो नेहमी मोठा भाऊ सुनील याला शिविगाळ करत होता. तसेच त्याला मारहाणही करायचा. तो काहीही काम करत नव्हता. तसेच चोऱ्या करून नशेबाजी करीत असल्याने घरच्यांनी मृत आकाशला वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. १२ ऑक्टोबर २०१७ रोजीच्या रात्री घरी आलेला मृत आकाश आईकडे दारूसाठी ५०० रुपयांची मागणी केली. मात्र आईने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तो घरातून बाहेर पडला.

लाकडी दांडक्याने आकाशला मारहाण केली

रात्री पुन्हा दारूच्या नशेत आकाश घरी आला. मात्र, मोठ्या भावाने त्याला दारू न पिण्याबाबत बजावले असता त्याने भावाला शिवीगाळ केली. तसेच त्याच्याकडे देखील दोन हजार रुपयांची मागणी करून घरातून बाहेर पडला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा घरी आलेल्या मृत आकाशला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो जोरजोरात शिव्या देऊ लागल्याने याच रागातून मोठा भाऊ सुनीलने घरातील लाकडी दांडक्याने आकाशला मारहाण केली. यामध्ये गंभीर झालेल्या आकाशला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

न्यायालयात १२ साक्षीदारांकडून साक्ष
नारपोली पोलीस ठाण्याचे त्यावेळेचे पोलीस उपनिरीक्षक गोर्डे यांनी न्यायालयात वेळोवेळी आरोपी विरोधात पुरावे सादर केले. तर खुनाच्या सुनावणी दरम्यान जिल्हा न्यायालयाने १२ साक्षीदारांकडून साक्ष घेतली. तसेच सरकारी वकील म्हणून विवेक कडू यांनी काम पहिले. तर संपूर्ण कार्यवाहीत खटला चालविण्यास एच. सी. गौरवा पचेगावकर यांनी सहकार्य केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.