ETV Bharat / state

Thane Crime: आक्षेपार्ह पोस्टला कमेंट करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण; अर्धनग्न अवस्थेत काढली धिंड, १२ आरोपी अटक - इंस्टाग्राम अकाऊंडची तपासणी

ठाणे येथील देवी देवतांविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा मुद्दा गाजत असतानाच, एका मुलाने अशाच एका पोस्टला कमेंट्स केली. या कारणामुळे जमावाने 17 वर्षीय मुलाला बेदम मारहाण करून जमिनीवर नाक घासायला लावले असल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

Thane Crime
तरुणाला बेदम मारहाण
author img

By

Published : May 20, 2023, 6:38 PM IST

Updated : May 20, 2023, 7:05 PM IST

तरुणाला बेदम मारहाण करताना व्हिडिओ

ठाणे : काही दिवसापूर्वी लोणावळा येथील कार्ले डोंगरावरील एकविरा देवी विषयी आक्षेपार्ह पोस्ट वायरल झाली होती. त्याच पोस्टला कल्याण येथील एका तरुणाने कमेंट केली होती. कमेंट करणाऱ्याचा तरुणाचा शोध जमावाने घेऊन त्या तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच कल्याणच्या बारावे येथील एकविरा देवीच्या मंदिरात नेऊन देवीच्या समोर नाक घासायला लावले. तर अर्धनग्न अवस्थेत त्याची धिंडही काढली आहे. या गंभीर प्रकरणाची कल्याण खडकपाडा पोलिसांनी दखल घेऊन 25 ते 30 जणांच्या जमावावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तर आतापर्यंत बारा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

भक्तांच्या मनात संतापाची लाट: पुणे जिल्ह्यातील कार्ले येथील, एकवीरा देवी विषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पूजा सावळे नामक युजरने इन्स्टाग्रामवर आई एकवीरा देवीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे ठाणे, पालघर, रायगड, मुंबई येथील एकवीरा देवीवर श्रद्धा असणाऱ्या भक्तांच्या मनात संतापाची लाट उसळली होती. इंस्टाग्रामवर कमेंट करणाऱ्या तरुणांचा शोध सुरू असतानाच, कल्याण येथील राहणाऱ्या युवकाला देवीवर श्रद्धा असणाऱ्या शेकडो तरुणांनी बेदम मारहाण केली. एकीकडे या घटनेबाबत आगरी कोळी समाजाचे काही तरुण शांततेत पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देऊन संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे काही तरुणांनी इन्स्टाग्रामवरवर पोस्ट करणाऱ्या तरुणांचा शोध घेऊन त्यांना मारहाण करण्याचा सपाटा सुरू केला आहे.

अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली: दरम्यान, आगरी कोळी या यूजर आयडीच्या मोबाईल फोनमधील फिर्यादीच्या इंस्टाग्राम अकाऊंडची तपासणी करताना, काही नेटकऱ्यांनी आक्षेपार्ह संदेश पोस्ट केले. परिणामी, फिर्यादीने नमुदच्या इंस्टाग्राम खातेधारकाला त्याच्या पोस्ट हटविण्यास सांगितले होते. त्यानंतर १९ मे रोजी सायंकाळी 4:30 च्या सुमारास फिर्यादी त्यांच्या कामाच्या ठिकाणी रिबन्स आणि बलून केकशॉप, अंबर वडापाव जवळ, सिनेमॅक्स खडकपाडा कल्याण पश्चिम येथे काम करत असताना, 20 ते 25 लोकांचा जमाव दुकानावर आला. फिर्यादीला वडवली अटाळी परिसरातील जंगलात बोलावून बेदम मारहाण केली. त्याचे कपडे फाडून त्याची रस्त्यावर धिंड काढली, त्याचा व्हिडीओ बनवून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

नाक घासून आई एकविरेच्या मंदिरात माफी: आरोपीमध्ये दर्शना बाळाराम पाटील, शर्मिला प्रकाश लिंबरे, डेजी जॉन डोंगरे, निकिता रोशन कोळी, समर्थ भुवना चेंडके, अभिजीत दीपक काळे, प्रथमेश राजाराम डायरे, साहिल महेश नाचणकर, कुणाल शरद भोईर, नितीन दशरथ माने, दीपक व्यंकट शिंदे, विजय भिवा कदम, सागर चिंतामण निळजेकर, विनय सुतार, जय भोईर, नितेश ढोणे, आणि इतर दहा अश्या ३० जणांच्या जमावाने त्या तरुणाला बारावे गावातील आई एकविरेच्या मंदिरात नेले. फिर्यादीचे नाक घासून आई एकविरेच्या मंदिरात माफी मागायला लावली. या गंभीर घटनेची कल्याण खडकपाडा पोलिसांनी गंभीर दखल घेत, १२ आरोपींना अटक केली आहे.

बारा आरोपींना अटक: पोलिसांनी या घटनेबाबत कायदा हातात न घेता असे पोस्ट करणारे, तरुण आपल्याला आढळून आल्यास संबंधित पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी आतापर्यंत एक बारा आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये काही महिलांचा समावेश आहे. व्हिडिओच्या माध्यमातून मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. Thane Crime भिवंडीच्या इंडियन कंपाउंड गेटजवळ ३ बांगलादेशी तरुणांना अटक २२ मे पर्यत पोलीस कोठडी
  2. Thane Crime देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसांसह दोन गुन्हेगारांना अटक
  3. Thane Crime बेकायदेशीर लाकूड वाहतूक करणाऱ्या आठ ट्रकवर कारवाई वनविभागाकडून गुन्हा दाखल

Last Updated : May 20, 2023, 7:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.