ETV Bharat / state

भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

author img

By

Published : Nov 13, 2020, 9:54 AM IST

Updated : Nov 13, 2020, 10:18 AM IST

भिंवडीत यंत्रमाग कारखान्यात भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग मोठी असल्याने कारखान्याजवळ वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

major-fire-broke-out-in-bhivandi
आग

भिवंडी (ठाणे ) - शहरातील खोका कंपाऊंड परिसरात भीषण आग लागली आहे. हा यंत्रमाग कारखाना असून यात मोठ्या प्रमाणात कपड्यांचा साठा असल्याचे सांगितले जात आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.या आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आग मोठी असल्याने कारखान्याजवळ वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू

भिवंडीतील मनसुख जाखरिया यांच्या मालकीचा कल्याण नाका परिसरातील खोका कंपाऊंडमध्ये यंत्रमाग कारखाना आहे. या कारखान्यात कपड्यांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. कारखान्याच्या आजूबाजूला सुमारे ४० ते ५० रहिवाशी घरे आहेत. आग लागतच रहिवासी परिसरात एकच खळबळ उडाली. ही आग एवढी भीषण आहे की कारखानाच्या छताचे पत्रे तुटून हवेत उडत होते. त्यामुळे आजूबाजू राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अग्निमशन दलाच्या जवानांनी पोलिसांच्या व स्थानिकांच्या मदतीने रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हवलुन त्यांच्या घरातील गॅस सिलेंडरही काढले. दरम्यान, या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी २ तास लागणार असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. आतापर्यंत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

Last Updated : Nov 13, 2020, 10:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.