ठाणे - औषध दुकानदाराकडून जबरदस्तीने पैशांची मागणी केल्यानंतर दोन पोलिसांना निलंबित तर दोन पोलिसांंवर बदलीची कारवाई करण्यात आली आहे. ही घटना नवघर येथे 6 मे रोजी घडली होती. औषध दुकानदाराने केवळ औषध विकण्याऐवजी शक्तीवर्धक द्रव विकत असल्याच्या कारणातून, संशयित आरोपी असलेल्या पोलीस शिपायांनी त्यांच्याकडून गुन्हा दाखल न करण्याच्या अटीवर लाचेची मागणी केल्याचा आरोप होता.
चार पोलीस शिपाई नवघर येथील औषध दुकानाकात गेल्यानंतर, त्यांना दुकानात काही शक्तीवर्धक द्रव आढळून आले. त्यांनी त्यानंतर गुन्हा दाखल न करण्याच्या अटींवर दुकानदाराकडून 18 हजार रुपये घेतले आणि 1 लाख रुपयांची मागणी केली. पोलीस शिपाई किरण घुगे आणि अमोर राऊळ यांना निलंबित करण्यात आले आहे तर इतर दोघांची बदली करण्यात आली आहे.