ETV Bharat / state

तरुणाचे प्रसंगावधान.. महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची आर्त हाक प्रशासनापर्यंत पोहोचवली - train stucked in flood

मुंबईजवळच्या वांगणीमधील पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेस आणि त्यातील प्रवाशांची सुटका करण्यात कोल्हापूरच्या विश्वजीत भोसले नावाच्या तरुणाने महत्वाची भूमिका पार पाडली होती. विश्वजीतने शेअर केलेले व्हिडीओ पाहून सकाळपासून सर्वच वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्राने महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकल्याची बातमी लावून धरली.

महालक्ष्मी
author img

By

Published : Jul 30, 2019, 11:58 AM IST

Updated : Jul 30, 2019, 7:06 PM IST

ठाणे - मुंबईजवळच्या वांगणीमधील पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेस आणि त्यातील प्रवाशांची सुटका करण्यात कोल्हापूरच्या विश्वजीत भोसले नावाच्या तरुणाने महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्याने या ट्रेनची परिस्थिती सोशल मीडियाच्या माध्यमाने सर्वत्र पोहचवत प्रशासनाला जाग आणली होती.

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची आर्त हाक तरूणाने प्रशासनापर्यंत पोहोचवली

मुंबईजवळील वांगणी येथे २६ जुलैला पुराच्या तडाख्यात मुंबई ते कोल्हापूरला जाणारी 'महालक्ष्मी एक्सस्प्रेस' अडकून पडली होती. या ट्रेनने १०५० च्या जवळपास प्रवासी प्रवास करत होते. अंबरनाथजवळ मुसळधार पावसामुळे रेल्वेमार्गावर पाणी साठलेले असल्याने त्याठिकाणी काही काळ रेल्वे थांबवण्यात आली. रुळावरून पाणी उतरताच गाडी आपल्या दिशेने निघाली. बदलापूरपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर कासगावजवळ गाडी पुन्हा थांबली. काही वेळ गाडी थांबून पुन्हा पुढे निघेल अशी प्रवाशांना अपेक्षा होती. पण, पाण्याच्या वाढत्या जोरात गाडी अडकून पडली. ही ट्रेन जवळजवळ 15 तास पुरात अडकून होती. याच ट्रेनमधून प्रवास करणारऱ्या एका तरुणाने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत सोशल मीडियाचा उत्तम वापर करत ही घटना वृत्तवाहिन्या आणि शासनापर्यंत पोहोचवली.

विश्वजीतने शेअर केलेले व्हिडीओ पाहून सकाळपासून सर्वच वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्राने महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकल्याची बातमी लावून धरली. जवळजवळ 15 तासांनंतर स्थानिक गावकर्‍यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना धीर दिला. प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलानं मिशन महालक्ष्मी एक्स्प्रेस सुरू करत सर्वच प्रवाशांची सुखरूप सुटका केली.

विश्वजीत भोसले यांनी जागृक नागरिक म्हणून प्रसंगावधान राखत केलेल्या या कामगिरीमुळे महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकून पडलेल्या हजारो प्रवाशांच्या कुटुंबीयांना त्यांच्या नातेवाईकांची माहिती मिळण्यास मदत झाली. थरकाप उडवणाऱ्या अशा परिस्थितीतही विश्वजीत यांनी धीर न सोडता मिशन महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये केलेल्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Intro:सोबत vo1 ते vo5 आणि बाईट2 ते बाईट5 सोबत जोडले आहेत. स्क्रिप्ट मध्ये लिहिल्यानुसार पॅकेज एडिट करावा.

बदलापूर

फाटलेलं आभाळ आणि वाढत जाणारी पाण्याची पातळी....अंगावर काटा आणणाऱ्या अशा परिस्थितीत शुक्रवारी वांगणीत झालेला तुफान पाऊस आणि पुराचं पाणी रेल्वे रुळांवर
आल्यानं अडकलेली 'महालक्ष्मी एक्सस्प्रेस'....चिंता....थरकाप आणणारा हा दिवस....
ट्रेनच्या आत पाणी शिरलं असतानाही दूर दूर पर्यंत मदतीसाठी कोणताही पर्याय दिसत नव्हता....जवळजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस पाण्यात अडकून 15 तास उलटल्यानंतर ही घटना समोर आली आणि सुरू झालं मिशन महालक्ष्मी एक्स्प्रेस....पण एक मिनिटांसाठी असा विचार करा की जर वांगणीतल्या पुरात महालक्ष्मी एक्स्प्रेस ही ट्रेन अडकलीये हे कळलंच नसतं तर ???? जर ही घटना समोर आलीच नसती तर कदाचित तिथलं चित्र आणखीनच भीषण असतं....होय, अशा भीषण परिस्थितीतही त्याच ट्रेनमधून प्रवास करणारा तरुण हा सुखरुप सुटका झालेल्या सर्व प्रवाशांसाठी देवदूत ठरलाय....हो देवदूतच..
पहा हा स्पेशल रिपोर्ट ....Body:Vo2

GFX
दिनांक:- 26 जुलै 2019
वेळ:- रात्री 8 वाजून 20 मिनिटं
ठिकाण:- सीएसटी

दररोजच्या वेळापत्रकानुसार मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास करणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस सीएसटी स्टेशनवरून निघाली...या ट्रेनमधून प्रवास करणारे 1050 प्रवासी आपल्या कोल्हापूरला पोहोचल्यानंतर काय काय करायचं याच सगळ्याच सगळं प्लॅनिंग केलं होतं...पण पुढे गेल्यानंतर त्यांच्यापुढे इतकं भीषण चित्र वाढून ठेवलय याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती....सुरुवातीला रेल्वे वेळेवर धावत होती. पण अंबरनाथजवळ मुसळधार पावसामुळे रेल्वेमार्गावर पाणी साठलेलं होतं. त्यामुळे त्याठिकाणी काही काळ रेल्वे थांबवण्यात आली.
बराच वेळ गाडी थांबल्यानंतर प्रवासी अस्वस्थ झाले. पाणी थोडंसं कमी झाल्यानंतर गाडीने पुन्हा आपला रस्ता धरला. बदलापूर मागे टाकून गाडी पुढे निघाली. पण बदलापूरपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर कासगावजवळ गाडी पुन्हा थांबली. काही वेळ गाडी थांबून पुन्हा पुढे निघेल अशी प्रवाशांना अपेक्षा होती. पण यावेळी मोठं संकट उभं राहिलं.

बाईट:- विश्वजीत भोसले,

(MH_Badalapur_SPLStory_PKG_MahalxmiExpress_KStudy_Byte2_MH10009)

Vo3

अंधारलेल्या रात्रीत चमकणारी वीज तेवढ्या काळापुरता प्रकाश, पुढे खोल गडद अंधारच अंधार, कोसळणारा, गाडीच्या टपावर मुसळधार वाजणारा पाऊस, मिनिटाला वाढणारं गाडीची चाकं गिळणारं पाणी, त्यात २६ जुलैचा दिवस असल्याने धास्ती, भीती आणि १४ वर्षांपूर्वीच्या कटू आठवणी, असं सर्व भयावह चित्र गाडीत अडकलेल्या प्रवाशांचं होतं. गाडी थांबल्यावर संपूर्ण रात्र प्रवासी अन्न पाण्याविना मदतीच्या प्रतीक्षेत होते. गाडीतील पाणीही संपल्याने पावसाच्या पाण्यावरच त्यांनी आपली तहान भागवली.

मध्यरात्री तीनच्या सुमारास गाडी मधोमध अडकून पडली होती आणि आजुबाजूला संपूर्ण पाण्याने वेढले होते. मात्र, प्रवाशांनी कशी बशी रात्र काढली. मध्यरात्रीनंतर पुराचे पाणी डब्ब्यात शिरल्यानंतर प्रवाशांना धडकी भरली होती. मात्र, प्रवाशांनी एकमेकांना धीर दिला. अशा परिस्थितीत मात्र याच ट्रेनमधून प्रवास करणारा एक तरुण होता ज्याने परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि सोशल मीडियाचा उत्तम वापर करत ही घटना वृत्तवाहिन्या प आणि शासनापर्यंत पोहोचवली...

Byte:- विश्वजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी,महावितरण.

(MH_Badalapur_SPLStory_PKG_MahalxmiExpress_KStudy_Byte3_MH10009)

विश्वजीत रावसाहेब भोसले असं या तरुणाचं नाव आहे....तो मूळचा कोल्हापूरचा आहे...सध्या तो महावितरणमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून तो काम करतो...त्या दिवशी रविवारची सुट्टी असल्याने याच ट्रेनने तो कोल्हापूरला निघाला होता...ज्यावेळी अडकलेल्या ट्रेन पासून मदत किती तरी अंतरावर दूर होती तेव्हा याच तरुणाने आपल्या जनसंपर्क कौशल्याचा पुरेपूर वापर करून ही ट्रेनमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांसोबत संवाद साधून ते व्हिडीओ सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल केले. काळ्यामिट्ट अंधारात आणि तुफान कोसळत्या पावसात जिथं फूटभर अंतरावरचा माणूस दिसत नव्हता, पण तरीही त्या काळरात्री विश्वजीत हजारो जणांसाठी देवदूतासारखा धावून आला.
Conclusion:Vo4

विश्वजीतने शेअर केलेले व्हिडीओ पाहून सकाळपासून सर्वच वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्राने महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकल्याची बातमी लावून धरली. जवळजवळ 15 तासांनंतर स्थानिक गावकर्‍यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना धीर दिला. प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.
एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलानं मिशन महालक्ष्मी एक्स्प्रेस सुरू करत सर्वच प्रवाशांची सुखरूप सुटका केली.

बाईट:- विश्वजीत भोसले

(MH_Badalapur_SPLStory_PKG_MahalxmiExpress_KStudy_Byte4_MH10009)

Vo5

विश्वजीत भोसले यांनी जागृक नागरिक म्हणून प्रसंगावधान राखत केलेल्या या कामगिरीमुळे महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये अडकून पडलेल्या हजारो प्रवाशांच्या कुटुंबीयांना त्यांच्या नातेवाईकांची माहिती मिळण्यास मदत झाली. तसेच अशा परिस्थितीत नातेवाईकांना घाबरून सोडणाऱ्या अफवांवर देखील आळा बसण्यास मदत झाली. थरकाप उडवणाऱ्या अशा परिस्थितीतही विश्वजीत यांनी धीर न सोडता मिशन महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये केलेल्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

बाईट:- विश्वजीत भोसले

(MH_Badalapur_SPLStory_PKG_MahalxmiExpress_KStudy_Byte5_MH10009)

लोक देव शोधण्यासाठी मंदिर, मुर्ती आणि दर्ग्यांकडे धाव घेतात. पण देव अशाच विश्वजीत भोसले सारख्या लोकांच्या रुपानं तुमच्यासाठी धावून येतो, हे मात्र नक्की

Last Updated : Jul 30, 2019, 7:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.