ठाणे: मिळालेल्या माहितीनुसार पीडिता उल्हासनगर कॅम्प परिसरात राहते. ती एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. तर आरोपी हा कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हारळ गावातील एका इमारतीमध्ये राहतो. २२ फ्रेबुवारी २०१८ रोजी पीडितेच्या भावाच्या माध्यमातून आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर मैत्री होऊन आरोपीने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बाहेर फिरण्याच्या बहाण्याने पीडितेला नेत होता. त्यातच आरोपीने पीडितेशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.
सेक्स आणि आर्थिक धोका: काही दिवस आरोपी हा पीडिता राहत असलेल्या परिसरात राहण्यास होता. त्यावेळी त्याने पीडितेसोबत शारीरिक संबंधासाठी हट्ट करीत संबंध ठेवले. त्यानंतर प्रेमाच्या आणाभाका देऊन ११ ऑगस्ट २०१८ ते २० नोव्हेंबर २०२१ पर्यंत विविध ठिकाणी बहाण्याने नेऊन पीडितेवर आरोपीने अत्याचार केला. दरम्यान, पीडितेने लग्नाचा तगादा लावला असता आरोपीने घर दुरुस्ती केल्यावर लग्न करू; मात्र दुरुस्तीसाठी पैसे लागतील, असे सांगून आरोपीने पीडितेकडून ६० हजार रुपये घेतले. शिवाय दोन महागडे मोबाईल फोनही पीडितेकडून आरोपीने घेतल्याचे तक्रारीत नमूद केले. पीडितेने आरोपीच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला; मात्र त्यांनी पीडितेला अपमानित करून तू दुसऱ्या जातीची आहे. त्यामुळे आम्ही लग्न करणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीला पीडितेने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो भेटण्यासाठी टाळाटाळ करून पीडितेच्या मोबाईल नंबर ब्लाक केला.
तक्रार दाखल पण आरोपी फरारच: त्यानंतरही पीडितेने आरोपीकडे वारंवार लग्नाचा तगादा लावला असता, त्याने स्वत:ला पोलीस खात्यात असल्याचे भासवून पीडितेला धमकावले. खळबळजनक बाब म्हणजे, आरोपीने काही महिन्यांपूर्वीच दुसऱ्या तरुणीशी गुपचूप लग्न केल्याचे पीडितेला माहिती मिळताच आपली फसवणूक करून आरोपीने धोका दिल्याचे तिला समजले. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून १ जून २०२३ रोजी कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल होऊन २७ दिवस उलटून गेली तरी देखील पोलीस आरोपीला पकडत नसल्याचा आरोप पीडितेने केला असून आरोपीला तातडीने अटक करून त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. या बाबत पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता आरोपीचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा:
- Pune Crime News: पुण्यात दर्शना पवार हत्येची पुनरावृत्ती टळली, एकतर्फी प्रेमातून तरुणीवर केला कोयत्याने हल्ला, पहा सीसीटिव्ही
- Woman Police Suicide : मुंबई पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबलची फलटणमध्ये आत्महत्या; कारण अस्पष्ट
- Solapur News : सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग; विवाहितेने उचलले 'हे' टोकाचे पाऊल