नवी मुंबई - कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पोलिसांचा जनजागृतीपर लॉंग मार्च काढण्यात आला. यामध्ये आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सहभाग घेतला.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबधितांची संख्या कमी करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, नवी मुंबईतील कोपर खैरणे, तुर्भे परिसरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या पाहता नवी मुंबई पोलीस आयुक्तांलयाच्या माध्यमातून प्रतिबंधित क्षेत्रात लॉंग मार्च काढण्यात आला. यामध्ये कोरोनाशी जिद्दीने लढणाऱ्या पोलीस, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल उंचवण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ या लॉंगमार्चमध्ये सहभागी झाले होते. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घरी थांबून कोरोनाच्या संसर्गाची वाढती साखळी खंडित करावी असे आवाहन लॉंगमार्चमध्ये सहभागी झालेल्या पोलिसांनी केले. या लॉंगमार्चमध्ये परिमंडळ 1 चे उपायुक्त पंकज डहाणे, परिमंडळ दोन महापालिका उपायुक्त डॉ. अमरिश पटनगिरे सहभागी झाले होते.