ETV Bharat / state

नवी मुंबईतील ४२ हॉटस्पॉटमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला...

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात काही शहरातील लॉकडाऊनचा कालावधी संपला आहे. तर काही शहरांमध्ये अजूनही लॉकडाऊन सुरूच आहे. दरम्यान, नवी मुंबईतील लॉकडाऊनचा कालावधी कालच संपला असून, महापालिकेनं ४२ हॉटस्पॉट असलेल्या भागातील लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला आहे.

Lockdown in 42 hotspot sections in Navi Mumbai extended till July 31
नवी मुंबईतील ४२ हॉटस्पॉटमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला...
author img

By

Published : Jul 20, 2020, 7:23 PM IST

नवी मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात काही शहरातील लॉकडाऊनचा कालावधी संपला आहे. तर काही शहरांमध्ये अजूनही लॉकडाऊन सुरूच आहे. दरम्यान, नवी मुंबईतील लॉकडाऊनचा कालावधी कालच संपला असून, महापालिकेनं ४२ हॉटस्पॉट असलेल्या भागातील लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला आहे.

हॉटस्पॉट वगळता इतर भागात लॉकडाऊन हटवला जाणार असल्याची माहिती नवी मुंबईचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे. दिवसेंदिवस नवी मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पालिकेने लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याची मुदत कालपर्यंत म्हणजे 19 जुलैपर्यंत होती. मात्र, हॉटस्पॉट असलेल्या भागातील लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.