नवी मुंबई : राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाने ( Department of State Excise ) धडक कारवाई करत पनवेल परिसरातील कोपरा गावच्या हद्दीत अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. एकूण 75 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात (75 lakh worth of goods seized) आला आहे. नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ( background of Christmas and New Year ) हा मद्यसाठा आला होता.
नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यसाठा येणार असल्याची मिळाली माहिती : नाताळ व नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या दारूची आवक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क चे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना मिळाली.
प्रतिबंधित असलेल्या रॉयल ब्लू व्हिस्कीच्या बाटल्या केल्या : राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने सापळा रचून पथकर वसुली नाक्याच्या पुढील बाजूला एक संशयितरित्या ट्रक उभा होता, त्या ट्रकची तपासणी केली असता, महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या रॉयल ब्लू व्हिस्कीच्या बाटल्यांचे, ८९८ बॉक्स जप्त करण्यात आले. याप्रकरणी संदीप पंडीत(३८) या ट्रकचालकाला व समाधान धर्माधिकारी या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात आली आहे.