ETV Bharat / state

Property Tax Relief : मुंबईप्रमाणेच ठाणेकरांनाही मालमत्ता करात सूट

author img

By

Published : Jan 22, 2022, 6:54 AM IST

मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता करात सवलत दिल्यानंतर आता ठाणेकरांना मालमत्ता कर माफ ( property tax exemption) करण्याबाबत विचाराधीन आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) यांनी सांगितले. दरम्यान, मेट्रो -3 कारशेडसाठी (Metro-3 Carshed) नव्या जागेचा शोध घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde
एकनाथ शिंदे

मुंबई: मुंबईत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला. मुंबईपाठोपाठ आता राज्यातील अन्य महापालिकांमध्येही मालमत्ता करात सूट दिली जाणार आहे. दरम्यान, ठाणे महापालिकेने यापूर्वीच ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा ठराव शासनाकडे पाठविला आहे. लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मेट्रो 3 कांजूरमार्ग येथील कारशेडचा वाद असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र उर्वरित काम युद्धपातळीवर सुरु आहे. मेट्रो 3 चे कारशेड अन्य ठिकाणी बनवत येईल का, याचा विचार सुरू आहे. प्रशासकीय स्तरावर जागेची चाचपणी करण्यात येत आहे. लवकरच मार्ग काढू, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
स्थानिक पातळीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशा निर्देश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थानी शाळा सुरू करण्यास तयारी दर्शवली आहे. पालकांची परवानगी आवश्यक आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रभाव असेल तिकडे शाळा सुरू करण्याची घाई करू नये, आरोग्याची काळजी महत्वाची असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.