ठाणे - कल्याणच्या रेल्वे स्थानकात काळजाचा ठोका चुकविणारी घटना घडली. धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढताना एका प्रवाशी महिलेचा तोल जाऊन रेल्वे फलाटाच्या गॅपमध्ये जात असताना रेल्वे स्थानकात कर्तव्य बजावणाऱ्या रेल्वे पोलिसाने तत्परतेने धाव घेत, त्या प्रवाशी महिलेला फलाट व गॅपमध्ये जाण्यापूर्वीच बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचवले. हा धक्कादायक प्रकार रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. डोमाडे असे महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्यासह रेल्वे पोलीस कर्मचारी गव्हाणे व काटकर असे त्या प्रवाशाला वाचविणाऱ्या देवदूत पोलिसांचे नाव आहे. नंन्दजी राम मौर्या , (वय 65 ) असे जीव वाचलेल्या महिला प्रवाश्याचे नाव आहे.
चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न - मंगळवारी १० मे रोजी सकाळी १० वाजल्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थनाकातील ४ आणि ५ फलाटावर रेल्वे पोलीस पथक गस्तीवर होते. त्याच सुमारास दूरंन्तो एक्सप्रेस ट्रेन फलाट नं ५ वर आली असता त्या ट्रेनमधून महिला प्रवासी नंन्दजी यांना वाटले कि, सीएसएमटी रेल्वे स्थानक आले त्यामुळे त्या ट्रेनमधून उतरून पतीची उतरण्याची वाट पाहत होत्या. परंतू त्यांचे पती ट्रेनमधून ऊतरले नाही. त्यातच ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली असता त्यांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला असताना त्यांना दरवाजाचे हँन्डल पकडता न आल्याने त्या चालत्या ट्रेनमधून फलाट पडून ट्रेन खाली जात असताना कर्तव्यावरील महिला पोलीस अंमलदार डोमाडे, पोलीस कर्मचारी गव्हाणे व काटकर यांनी तात्काळ विलंब न करता ट्रेन खाली जात असलेल्या महिलेला ओढून बाहेर काढले.
ट्रेनची चैनपूलींग - या घटनेमुळे ती महिला खूप घाबरलेली होती. त्यानंतर तिला शांत करून विचारपूस करत असताना ट्रेनची चैनपूलींग झाली व ट्रेन थांबली. त्यावेळी ट्रेनमधून त्यांचे पती ऊतरले व तिच्या जवळ येवून रेल्वे पोलिसांना सांगीतले की ही माझी पत्नी आहे. आम्हांला सीएसएमटी रेल्वे स्टेशन येथे ऊतरायचे होते, मात्र ती सीएसएमटी रेल्वे स्टेशन समजून कल्याण रेल्वे स्थनाकात ऊतरल्याचे त्यांच्या पतीने सांगितले. त्यानंतर कर्तव्यावरील रेल्वे पोलिसांनी वयोवृद्ध पत्नी - पती पत्नीस धीर देऊन पत्नीचा जीव वाचवल्याने त्या दोघांनी रेल्वे पोलीसांचे आभार मानले.