ETV Bharat / state

Leopard attacked : बिबट्याने हरिणीवर हल्ला करून पाडला फडशा, परिसरात भीतीचे वातावरण... - बिबट्याने हरिणीवर हल्ला

माळशेज घाट नजीकच्या उमरोली-सायले गावानजीक वन परिसरातुन हरणीचा कळप जात होता. त्यावेळी बिबट्याने पाठलाग करीत एका हरीणाची शिकार केली ( Leopard attacked on deer ) असल्याची माहिती स्थानिक गावकऱ्यांनी वन विभागाच्या पथकाला दिली. वनपथकाने महामार्गाच्या कडेला मृत अवस्थेत पडलेले हरिण पंचनामा करीत ताब्यात घेतले.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 29, 2022, 9:53 PM IST

ठाणे : माळशेज घाट - नगर महामार्गावरील सायले ,उमरोली गावाच्या हद्दीत असलेल्या जंगलात बिबट्याने हरिणीवर हल्ला ( Leopard attacked on deer ) करून फडशा पाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे पाहवयास मिळाले आहे. विशेष म्हणजे मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगाच्या वनपरिसरात जंगली हिंसक प्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसून आले आहे.

बिबट्याचा हल्ला - माळशेज घाट नजीकच्या उमरोली-सायले गावानजीक वन परिसरातुन हरणीचा कळप जात होता. त्यावेळी बिबट्याने पाठलाग करीत एका हरीणाची शिकार केली असल्याची माहिती स्थानिक गावकऱ्यांनी वन विभागाच्या पथकाला दिली. त्यानंतर बळेगांव क्षेत्राच्या वनरक्षक अल्पनाताई घोलप यांना माहिती मिळताच गणेश रावते, अर्जून फोडसे , डि.डी.निकम व त्यांच्या वनपथकाने महामार्गाच्या कडेला मृत अवस्थेत पडलेले हरिण पंचनामा करीत ताब्यात घेतले.

बिबट्याला पकडण्यासाठी योजना - हरीण मृत अवस्थेत आढळून आलेल्या संगमगांव ते उमरोली या २५ गांव वाड्यातील परिसरात जनजागृती करण्यात येत आहे. तर जंगलात बिबट्याला पकडण्यासाठी ठीक ठिकाणी टॅपकॅमेरे व पिंजरे लावण्याचा निर्णय घेतला वन अधिकाऱ्यांनी घेतला आहे. तर या परिसरात जूलै महिण्यापासून चार बिबट्यांचा वावर असून यात नरमादीसह दोन बछड्यांचा समावेश असल्याची शक्यता वनरक्षक अल्पना घोलप यांनी व्यक्त केली आहे.

वन्यप्राण्यांचा वावर - मुरबाड तालुक्यातील भिमाशंकर, कळसूबाई, हरिचंद्रगड या तीन अभयारण्य परिसर हद्दीत ७५ गावे आहेत. या अभयारण्यात वन्यप्राणी असणारे माकडे, लाल काळी रंगाची वानरे, हरीण, भेकरे, ससे, रानटी- डुक्कर, निलगाय, इत्यादी जंगली प्राणी गाव वाड्या-पाड्याच्या वस्त्यांकडे अन्न व पाण्याच्या शोधात येत असल्याने त्यांचा माग काढीत वाघ, लांडगे, तरसं, बिबट्या सारखे प्राणी देखील गाव वाड्या पाड्या लगत येत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातारावण पसरले आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.