ETV Bharat / state

ठाण्यात एकाच लग्नात सेनेच्या दोन्ही गटाचे नेते वऱ्हाडी, 'वर' शिंदे गटाचा तर 'वधू' ठाकरे गटाची

Shinde Thackeray Factions Marriage : शिवसेनेत शिंदे गट आणि ठाकरे गट अशी फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही. (Groom belongs to Shinde group) मात्र, आपसी वैमनस्य विसरून ठाण्यात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. यामध्ये वर शिंदे गटाचा तर वधू ठाकरे गटाची आहे. या विवाहाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या दोन्ही गटातील राजकीय नेते उपस्थित होते.

Shinde Thackeray Factions Marriage
'वधु' ठाकरे गटाची
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2023, 10:35 PM IST

अनोख्या विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती

ठाणे Shinde Thackeray Factions Marriage : शिवसेनेत उभी फूट पडून सरकार उलथल्यानंतर राज्याच्या राजकारणात शिंदे आणि ठाकरे गटामध्ये वैर वाढले. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. (bride belongs to Thackeray group) शिवसेना शाखांवरूनही दोन्ही गट अनेकदा आमने-सामनेही आले. असे असताना ठाण्यातील एका लग्नात सेनेच्या दोन्ही गटाचे नेते चक्क वऱ्हाडी म्हणून सहभागी झाल्याचे गुरुवारी दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (CM Eknath Shinde)

दोन्ही गटांच्या नेत्यांची विवाहाला उपस्थिती: ठाण्यात कासारवडवली येथे पार पडलेल्या विवाह सोहळ्यात 'वर' शिंदे गटाचा तर 'वधू' ठाकरे गटाची होती. या विवाह सोहळ्याला दोन्ही गटातील नेते उपस्थित राहिल्याने या विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, ज्या ठाण्यातून या वैराला सुरुवात झाली त्याच ठाण्यात हा विवाह सोहळा होता. शिंदे गटाचे आमदार रविंद्र फाटक यांचे स्वीय सहाय्यक अजिंक्य गावकर आणि ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा समन्वयक Adv. आरती खळे यांचा शुभ विवाह गुरुवारी रात्री पार पडला. या निमित्ताने दोन्ही गटातील नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि दोन्ही गटाचे स्थानिक पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक उपस्थित होते.

'या' अनोख्या लग्नाची चर्चा मोठी: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या. प्रत्येक ठिकाणी दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांच्यात खडाजंगी सुरू झाली. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी कोणीच सोडत नाही; परंतु ठाण्यात पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यात दोन्ही पक्षातील नेते उपस्थित राहिल्याने या विवाहाचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. यापूर्वीही अनेक राजकीय पक्षात आपसी मतभेत असले तरी भिन्न राजकीय पक्षातील नेत्यांनी एकमेकांच्या घरी सोयरीक केली. यामध्ये राजकीय विचार कुठेही बाधा ठरलेले नाहीत.

हेही वाचा:

  1. मराठा समाजातील उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; 'हे' उमेदवार नोकरीसाठी पात्र
  2. एसईबीसी उमेदवारांना 'ईडब्ल्यूएस'चा पर्याय हा न्याय्य अधिकार : अशोक चव्हाण
  3. सारंगखेडा घोडे बाजारात महागडे घोडे दाखल, करोडपती 'राधा'ने वेधले लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.