मीरा भाईंदर (ठाणे) - शहरात मोठ्या प्रमाणात महिलांवर अन्याय तसेच सोनसाखळी चोरीच्या घटनेत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाईंदर पोलिसांकडून महिला सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. भाईंदर पश्चिमेला शिवसेना गल्लीमध्ये महिला व पोलीस यांच्यात सवांद साधण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.
महिला सुरक्षा अभियान -
मीरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात महिलांवर अन्याय तसेच सोनसाखळी चोरीच्या घटनेत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर, वसई, विरार पोलिसांकडून जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. विविध ठिकाणी जाऊन पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे. महिलांनी आपल्या सुरक्षेसाठी काय केले पाहिजे? त्याचे मार्गदर्शन पोलिसांकडून करण्यात येत आहे. भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीमध्ये आज एक महिला सुरक्षा अभियान अंतर्गत महिला व पोलीस यांच्यात सवांद साधण्यात आला. यामध्ये स्थानिक महिलांनी त्यांचे प्रश्न मांडले. या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांकडून देण्यात आले.
हेही वाचा - अँटिलिया प्रकरण : 'ती' स्कॉर्पिओ विक्रोळीतून चोरी झाली होती?
महिलांनी सतर्क व सावधानता बाळगली पाहिजे -
मीरा भाईंदर, वसई, विरार पोलीस आयुक्तालयाकडून महिला सुरक्षा अभियान सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी जाऊन महिलांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या पहाटे मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांचे मंगळसूत्र, चैन चोरीच्या घटना होत आहेत. यामुळे महिलांनीही सतर्क राहिले पाहिजे, सावधानता बाळगली पाहिजे. एखादी घटना घडत असेल तर महिलांना सतर्क राहिल्याने चोराला पकडण्यात पोलिसांना मदत मिळते, असे मीरा भाईंदर परिमंडळ-१ चे सहाय्यक पोलीस आयुक्त शांतीलाल जाधव म्हणाले. यावेळी भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले उपस्थित होते.