ETV Bharat / state

एकीकडे कोरोना तर आता सुविधांअभावी आरोग्य कर्मचाऱ्यांचेच आयुष्य धोक्यात - Sweepers health in crisis kdmc latest news

महापालिकेत जवळपास 2 हजार सफाई कर्मचारी आहेत. तर 2-3 कंत्राटदारांचे जवळपास 200 कर्मचारी कार्यरत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सुरक्षेची कोणतीही साधने न देता केवळ ठोक पगारावर त्यांची बोळवण केली जाते. झोपडपट्टी, रस्ते, फुटपाथ यांची सफाई ते करत असतात. सतत घाणीत काम करत असल्याने यातील अनेकांना टीबीची लागण होते. मात्र, त्यांच्या आरोग्यासाठीच्या पालिकेच्या अनेक योजना केवळ कागदावरच आहेत.

Lack of facilities endangers the lives of health workers in thane
सुविधांअभावी आरोग्य कर्मचाऱ्यांचेच आयुष्य धोक्यात
author img

By

Published : Jul 4, 2020, 7:33 AM IST

ठाणे - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यातील सफाई कर्मचाऱ्यांचेच आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र समोर आले आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच्यावर मात करताना आरोग्य विभागाची तारांबळ उडाली आहे. तर दुसरीकडे पावसाळाही सुरु झाला आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात पुरविले जाणारे साहित्य गमबुट, हातमोजो, छत्री, रेनकोट अजूनही पुरविण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत त्याचे आयुष्य धोक्यात आले आहे. मात्र, तरीदेखील ते शहर स्वच्छ रहावे, रोगराई पसरु नये, असा विचार करून जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. जीव धोक्यात घालून सफाई कामगार कसे काम करतात? याचा व्हिडिओच व्हायरल केल्याने हा प्रकार समोर आला आहे.

महापालिकेत जवळपास 2 हजार सफाई कर्मचारी आहेत. तर 2-3 कंत्राटदारांचे जवळपास 200 कर्मचारी कार्यरत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सुरक्षेची कोणतीही साधने न देता केवळ ठोक पगारावर त्यांची बोळवण केली जाते. झोपडपट्टी, रस्ते, फुटपाथ यांची सफाई ते करत असतात. सतत घाणीत काम करत असल्याने यातील अनेकांना टीबीची लागण होते. मात्र, त्यांच्या आरोग्यासाठीच्या पालिकेच्या अनेक योजना केवळ कागदावरच आहेत. त्या योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोपही कर्मचारी वर्गाकडून केला जात आहे. अनेक कर्मचारी तर कर्करोग आणि टीबीसारख्या आजारांनी ग्रासलेले असल्याचीही धक्कादायक माहिती मिळाली आहे. आरोग्य सेवासुविधा मिळण्यातही अडचणी येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

  • कर्मचाऱ्यांची अपेक्षा -

सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवणे हे कंत्राटदाराचे काम नसून ती जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र, प्रशासन आपली जबाबदारी झटत आहे. त्यामुळे अनेक सफाई कामगार आजारांनी ग्रासले आहेत. पालिकेकडून कंत्राटदाराला तुटपुंजे पैसे दिले जात असल्याने रेनकोट, गणवेश, गमबूट, आदी सुविधा देऊ शकत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पालिकेकडून आरोग्याच्या सर्व सुविधा मोफत दिल्या जाव्यात. ओळखपत्र दाखवल्यावर त्यांच्याकडून केस पेपरचे पैसे घेऊ नये. याशिवाय इतर सर्व तपासण्या मोफत करण्यात याव्यात, अशी अपेक्षा या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - कोरोना रुग्णांची हेळसांड थांबणार; आरोग्य सुविधांच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती

घाणीत काम करत असल्याने गणवेश, साबण, टॉवेल, मास्क तसेच पावसाळ्यात गमबूट, रेनकोट देणे पालिकेला बंधनकारक आहे. मात्र, या सुविधा पालिकेने या सफाई कामगारांना दिल्या नाहीत. आजही अनेक सफाई कामगार भरपावसात कोणत्याही सुविधा मिळत नसताना हाताने घाण साफ करत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली शहरांचे आरोग्य सुदृढ ठेवणाऱ्या या सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे.

  • पावसामुळे स्वच्छतेवर ताण -

पावसात महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांवर कचरा उचलण्याचा आणि स्वच्छतेचा ताण आहे. असे असतानाही महापालिकेने कुठेही कचरा साचू दिला नाही. अन्यथा पावसाळ्यात साथीचे रोग झपाट्याने पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच कचरा उचलण्यावर भर दिल्याचा दावा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास शहरात शून्य कचरा मोहीम राबवणे शक्य होऊ शकते, याकडे घनकचरा व्यवस्थापनाने लक्ष वेधले आहे.

  • भांडार विभागाच्या फेरसूचना -

यावर्षी रेनकोट आणि गमबुट देय असलेल्या प्रभागांतील स्त्री, पुरुष कर्मचाऱ्यांच्या याद्या सर्व प्रभाग कार्यालयांना उपलब्ध केलेल्या आहेत. या संदर्भात सर्व प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना भांडार उपायुक्तांनी पत्र धाडले आहे. सदर पत्रात नमूद कार्यपध्दतीचा अवलंब करुन तशी यादी 3 दिवसांच्या आत भांडार विभागास पाठविण्याबाबत कळविण्यात आले. मात्र, प्रभागाची यादी भांडार विभागास प्राप्त न झाल्याने कर्मचाऱ्यांना रेनकोट आणि गमबुट वाटप करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे भांडार विभागाने फेरपत्र पाठवून याद्या मागितल्या आहेत.

विशेष म्हणजे यादी प्राप्त न झाल्यामुळे संबधीत कर्मचाऱ्यांना रेनकोट आणि गमबुट वाटपास होणाऱ्या विलंबास भांडार विभाग जबाबदार राहणार नाही, असेही या विभागाच्या उपायुक्तांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे. या संदर्भात घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पावसाळ्यात काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना लागणारे साहित्य आले आहे. यात रेनकोटचाही समावेश आहे. याबाबत सर्व प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना बुधवारी पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.

साहित्य वितरणाची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनाही साहित्य दिले जाणार असून तशा सूचना खाते प्रमुखांना दिल्या असल्याचे कोकरे यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.