ETV Bharat / state

Kopri Bridge : कोपरी पूलाचे चौपदरीकरण करण्याचे काम जवळपास पूर्ण, नव्या वर्षात वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता... - कोपरी पूलाचे चौपदरीकरण

२० नोव्हेंबरला कोपरब्रीजचे ( Kopri Bridge ) चौपदरीकरण करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले. केवळ डांबरीकरण आणि अन्य कामे शिल्लक आहेत. नव्या वर्षात कोपरी चौपदरीकरण झालेला पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 21, 2022, 9:27 PM IST

ठाणे : अनेकवर्ष चौपदरीच्या प्रयत्नात असलेला कोपरी पुलाचे ( Kopri Bridge ) आवश्यक असलेले सात गर्डेल शनिवारी आणि रविवारी टाकण्यात आले. यामुळे कोपरी पूल वाहतुकीसाठी चौपदरीकरणाचे ८० टक्के काम पूर्ण झालेले आहे. अवघ्या दीड महिन्यानंतर कोपरीपूल चौपदरी होऊन ठाणेकर आणि मुंबईकरांना भेडसावणारी वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटणार आहे.

कोपरीब्रीज ८० टक्के काम पूर्ण - ठाणे, भिवंडी, नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी मुख्य असलेला कोपरी ब्रीजवर ( Kopri Bridge ) पिकअप हावरमध्ये वाहतूक कोंडीच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या. सदर वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या एक दशकापेक्षा जास्त काळ प्रलंबित राहिलेला होता. कोपरीब्रीज विस्ताराचा प्रस्ताव अंदाजे १४ वर्षांपूर्वी ठेवण्यात आलेला होता. ४८ कोटी रुपयांचा प्रस्ताव २५८ कोटींवर पोहचला. कोपरी पुलाचे चौपदरीकरणाचा प्रस्ताव हा अमंलात आणण्यात आला. २० नोव्हेंबरला कोपरब्रीजचे चौपदरीकरण करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले. केवळ डांबरीकरण आणि अन्य कामे शिल्लक आहेत. नव्या वर्षात कोपरी चौपदरीकरण झालेला पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

वाहतूक कोंडीतून दिलासा - मुंबई, ठाणे, भिवंडी,नाशिक, आदी ठिकाणी वाहतुकीची लाईफलाईन असलेला कोपरब्रीज चौपदरीकरणाचे काम एमएमआरडीएने शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवसात ११० टनाचे आणि ६३ मीटर लांबीचे सात गर्डेल टाकण्याचे काम पूर्ण केले. यात शनिवारी १९ नोव्हेंबर, रोजी ३ गर्डेल आणि रविवारी २० नोव्हेंबर, रोजी ४ गर्डेल टाकण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले. येणाऱ्या नव्या वर्षांपासून ठाण्यात येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूककोंडी पासून दिलासा मिळणार असल्याची माहिती, शिवसेना खासदार राजन विचारे यांनी दिली.

वाहतूक पोलिसांची मेहनत - अखेर कोपरी पुलाच्या चौपदरीकरणाचे ८० टक्के काम पूर्ण झालेले आहे. आता काही दिवसात दीड महिन्यांत इतर कामे पूर्ण करून त्यावर डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर कोपरी ब्रिज हा वाहतुकीसाठी वाहतूककोंडी विरहित सुरु होईल. ठाण्यात कोपरी पुलावर काल रात्री सगळे गर्डर बसवण्यात आले. ठाणे मुंबई ला जोडणारा अत्यंत महत्वपूर्व हा पूल येत्या काही महिन्यात पूर्ण होताना पाहायला मिळेल तर हा पूल पूर्ण झाल्यावर आता पेक्षा दुप्पट क्षमतेने वाहतूक होण्यास मदत होईल. ठाणे शहरातील ट्रॅफिकची समस्या देखील कमी होताना पाहायला मिळेल याच गर्डर बसवतानाचे काही क्षण ड्रोन कॅमेरा मधून रेकॉर्ड केलेले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.