ETV Bharat / state

Knife Attack In Thane : खळबळजनक! तेराव्याच्या मंडपात रक्तरंजित राडा; ४ जखमी, एक आरोपी अटकेत, तिघे फरार - Ulhasnagar Attack

उल्हासनगरमध्ये आजोबांच्या तेराव्याचा कार्यक्रम सुरु असताना दारू पिऊन आलेल्या आरोपींनी चौघा जणांवर धारदार चाकूने हल्ला (Knife Attack In Ulhasnagar Of Thane District) केला. घटनेनंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केले असून त्याचे इतर तीन साथीदार मात्र पसार झाले आहेत.

विठ्ठलवाडी पोलीस ठाणे
विठ्ठलवाडी पोलीस ठाणे
author img

By

Published : Dec 8, 2021, 7:08 PM IST

ठाणे : तेराव्याचा कार्यक्रम मंडपात सुरु असतानाच तेथेच रक्तरंजित राडा झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर चार परिसरातील रघुवीर नगरमधील बंजारा कॉलीनीमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी चार राडेबाजांवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात (Viththalwadi Police Station) विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर तीन आरोपी फरार झाले आहेत. जखमींवर मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मंडपातील खुर्च्या फेकण्याच्या वादातून चाकू हल्ला
गंभीर जखमी असलेला दीपक राजू चिंडलीया (वय २७) हा उल्हासनगर (Ulhasnagar) कॅम्प नंबर चार परिसरातील रघुवीर नगरमधील बंजारा कॉलीनीमध्ये एका चाळीत राहतो. १४ दिवसापूर्वी त्याच्या आजोबांचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या तेराव्याचा कार्यक्रम ७ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घरासमोर मंडप उभारून सुरु होता. त्याच सुमाराला याच परिसरात राहणारे आरोपी प्रेम व रुद्र हे त्यांच्या दोन साथींदारांसह मद्यपान करून मंडपात आले. त्यांनतर अचानक मंडपातील खुर्च्या उचलून फेकत शिवीगाळ करू लागले. दीपक याने विरोध केला असता, त्याच्यावर आरोपीने धारदार चाकूने हल्ला केला. हल्ला होत असल्याचे पाहून दीपकचा मेहुणा सतीश हा त्याला वाचविण्यासाठी आला असता, त्याच्यावरही चाकूने वार करण्यात आले. दुसरीकडे अचानक झालेला जोरदार राडा पाहून तेराव्यासाठी आलेल्या मंडळींनी घाबरून मंडपातून पळ काढलाा.

आरोपींनी केली मंडपात दगडफेक
तेराव्यासाठी आलेल्या पाहुणे मंडळीने पळ काढताच आरोपीच्या दोन साथीदारांनी मंडपात दगडफेक केली. या दगडफेकीत दिपकची काकू राणी आणि राजकुमार जखमी झाले. जखमीपैकी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर दोघांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर, पोलिसांनी ३ फरार आरोपींचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवलदार व्ही. टी. कोळी करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.