ETV Bharat / state

टीटीईच्या सतर्कतेने अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा डाव उधळला.. अपहरणकर्त्यांना निजामुद्दीन-मुंबई राजधानी एक्सप्रेसमधून अटक

एका अल्पवयीन मुलीला फूस लावून दिल्लीहून मुंबईला घेऊन जाण्याचा दोघा अपहरणकर्त्यांचा मनसुबा टिटीईंच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला आहे. कल्याणच्या रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्यांना निजामुद्दीन-मुंबई राजधानी एक्सप्रेसमधून अटक करण्यात आली आहे.

author img

By

Published : Oct 6, 2021, 3:31 PM IST

Kidnappers of minor girl
Kidnappers of minor girl

ठाणे - एका अल्पवयीन मुलीला फूस लावून दिल्लीहून मुंबईला घेऊन जाण्याचा दोघा अपहरणकर्त्यांचा मनसुबा टिटीईंच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला आहे. कल्याणच्या रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्यांना निजामुद्दीन-मुंबई राजधानी एक्सप्रेसमधून अटक करण्यात आली आहे. शहाबुद्दीन आणि त्याचा साथीदार मुस्तफा असे अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.

टीटीईला संशय आल्याने प्रकार उघड -

शहाबुद्दीन आणि त्याचा साथीदार मुस्तफा हे दोघे 15 वर्षांच्या मुलीसह निजामुद्दीन-मुंबई राजधानी एक्सप्रेसने प्रवास करत होते. या एक्सप्रेसमध्ये कर्तव्यावर असलेल्या संदेश भानुशाली नावाच्या हेड टीटीईला संशय आला. जेव्हा भानुशाली यांनी त्यांचा सहकारी टीटीई यू.आर. यादव यांच्या मदतीने चौकशी केली तेव्हा कळले की, त्या मुलीला पळवून नेले जात आहे. त्यांनी तातडीने राजधानी एक्सप्रेसचे आरपीएफ स्कॉट एन. के. सिंग यांना माहिती दिली.

हे ही वाचा - कॉर्डिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आतापर्यंत १७ जणांना अटक !

मुलीला फूस लावून पळवून आणणारे गुडगावचे रहिवासी -

मुलीसह शहाबुद्दीन आणि मुस्तफा या दोन्ही तरुणांना कल्याणमध्ये आणण्यात आले. त्यानंतर कल्याणला मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास चाईल्ड केअर आणि आरपीएफसमोर कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. टीटीईचे प्रमुख संदेश भानुशाली यांनी यावेळी सांगितले की, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आलेली ही मुलगी नवव्या इयत्तेत शिकत आहे. तसेच तिला फूस लावून पळवून नेणारे गुडगावचे रहिवासी आहेत. सदर मुलीच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.