ठाणे : दिवसभराच्या तणावानंतर शिंदे गटाने ठाणे पोलीस आयुक्तालयात धाव घेत, अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत रोशनी शिंदे यांनी केलेल्या आक्षपार्ह पोस्ट संदर्भात समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर वातावरण गढूळ करण्याचे काम होत असल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे. हा गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी कट रचला आणि बनाव केला आहे. रोशनी शिंदे यांना पुढे करून त्यांना आक्षपार्ह पोस्ट टाकण्यास सांगितले.
आक्षपार्ह पोस्ट केल्यास गुन्हा दाखल: दरम्यान कासरवडवली पोलीस ठाणे हद्दीत प्रकार घडला असून पुढील चौकशी सुरु आहे. त्या महिलेच्या मारहाणीची माहिती घेत आहोत. रोशनी शिंदे यांनी आक्षपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे. अश्या प्रकारचे पोस्ट कोणी करू नये, तसे आढल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
ठाकरेंनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट: हल्ल्यानंतर रोशनी शिंदे यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी रोशनी दीपक शिंदे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तालय गाठले. यानंतर पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
टाळे ठोको मोर्चाचे आयोजन: रोशनी शिंदे मारहाणप्रकरणी राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणप्रकरणी आता उद्धव ठाकरे गट आक्रमक झाले आहे. ठाकरे गटाकडून आज दुपारी ३ वाजता टाळे ठोको मोर्चाचे आयोजन करण्यात आले . दुपारी तीन वाजता ठाण्यातील शिवाजी मैदानातून मोर्चाला सुरुवात होणार आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयावर हा मोर्चा धडकणार आहे.