ETV Bharat / state

कोरोनाचा धोका : कल्याण-डोंबिवलीत १० लाखांहून अधिक नागरिकांचे सर्व्हेक्षण

author img

By

Published : Apr 11, 2020, 4:34 PM IST

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंतेची बाब ठरली आहे. यावर आळा घालण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत. मात्र, काही नागरिक आजही बेजबादारपणे विनाकारण किराणा दुकाने, भाजी विक्रीच्या दुकानावर सोशल 'सोशल डिस्टंसिंग' न ठेवताच गर्दी करत आहेत.

Kalyan-Dombivli
कल्याण-डोंबिवलीत १० लाखांहून अधिक नागरिकांचे सर्व्हेक्षण

ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आतापर्यत 50 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या पार्शवभूमीवर खबरदारी म्हणून आरोग्य विभागाकडून आजपर्यंत एकूण 2 लाख 45 हजर 803 घरांना भेट देऊन 10 लाख 12 हजार 816 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंतेची बाब ठरली आहे. यावर आळा घालण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत. मात्र, काही नागरिक आजही बेजबादारपणे विनाकारण किराणा दुकाने, भाजी विक्रीच्या दुकानावर सोशल 'सोशल डिस्टंसिंग' न ठेवताच गर्दी करत आहेत. त्यामुळे सलग 4 दिवस भाजीपाला व किरणा विक्रीवर बंदी घातली आहे.

आज मोहने परिसरात एक 22 वर्षीय महिला रुग्ण आढळून आल्याने आता रुग्णांची संख्या 50 च्या घरात गेली आहे. तर यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून 11 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 37 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज आढळून आलेला हा रुग्ण मुंबईतील एका शासकीय रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहे.

  • उपचार घेत असलेले रुग्‍ण -
  1. कल्‍याण पूर्व - 6
  2. कल्‍याण पश्चिम - 5
  3. डोंबिवली पूर्व - 19
  4. डोंबिवली पश्चिम - 5
  5. अ, प्रभाग क्षेत्र परिसर - 2

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.