मुंबई - Chiranjeevi Guinness World Record : तेलुगू मेगास्टार चिरंजीवी यांनी रविवार, 22 सप्टेंबर रोजी इतिहास रचला आहे. मेगास्टार चिरंजीवी यांना सर्वात यशस्वी चित्रपट स्टार म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट अभिनेता आणि नर्तक म्हणून ओळखले जाते. दरम्यान बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानच्या हस्ते चिरंजीवी यांचा सन्मान करण्यात आला आहे. चिरंजीवी यांनी 1978 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. हैदराबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात चिरंजीवी यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं गौरव करण्यात आला.
#WATCH | Hyderabad, Telangana: Film star Chiranjeevi Konidela enters in Guinness World Record, gets most prolific star in Indian film industry actor, dancer award pic.twitter.com/tCxcVEvAQK
— ANI (@ANI) September 22, 2024
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड: आमिर खाननं हा सन्मान चिरंजीवी यांना देत असताना मिठी मारली. चिरंजीवी यांच्या उत्कृष्ट नृत्य कौशल्याचं कौतुक करताना आमिरनं म्हटलं, "तुम्ही त्यांचे कोणतेही गाणे पाहिल्यास आपल्याला दिसून येते की, त्यांचं मन नृत्यात चांगलं रमलं आहे. ते आनंदानं नृत्य करतात. आपल्या नजरा त्यांच्यावर असतात. आम्ही त्याच्यापासून खूप प्रभावित आहोत. पुढं त्यानं म्हटलं , "मी इथे येऊन खुश आहे. त्यांनी खूप यश मिळवलं आहे. तुम्हाला तुमच्या या प्रवासामध्ये आणखी यश मिळेल. आम्ही नेहमीच तुमची प्रशंसा करण्यासाठी उपस्थित राहू." यानंतर चिरंजीवी यांनी आपल्या भाषणात म्हटलं, "गिनीज रेकॉर्डबद्दल कधीही आशा नव्हती."
Never expected about the Guinness Record - #MegastarChiranjeevi pic.twitter.com/6bWYbdovpt
— Aryan (@chinchat09) September 22, 2024
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे निर्णायक रिचर्ड स्टेनिंग यांनी केलं भाष्य : चिरंजीवी यांना सन्मानित केल्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी रिचर्ड स्टॅनिंग यांनी म्हटलं, "आज गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनं अधिकृतपणे चिरंजीवी यांना अभिनेता आणि नर्तक म्हणून सर्वात यशस्वी भारतीय चित्रपट स्टार म्हणून घोषित केलंय. ही एक विलक्षण कामगिरी आहे, त्यांनी 143 चित्रपटांमधील 537 गाण्यांमध्ये नृत्य केलंय. हे अधिकृत आकडे आहेत. ही खूप मोठी संख्या असून याला आम्ही मान्यता देतो."
Thank you for your kind words Aamir Khan ji ❤️
— Chiranjeevi Trends™ (@TrendsChiru) September 22, 2024
pic.twitter.com/X8wBKUfC6H
143 चित्रपटांमध्ये 537 गाणी आणि 24,000 डान्स मूव्ह्स : चिरंजीवी यांचं जन्म नाव कोनिडेला शिवशंकर वरप्रसाद आहे. त्यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीत जवळपास 5 दशकांपूर्वी पदार्पण केलं. आपल्या 46 वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी 143 चित्रपटांमधील 537 गाण्यांमध्ये 24,000 डान्स मूव्ह्ज सादर केले आहेत. आता या सन्मानंतर भारतीय चित्रपटसृष्टीतील दर्जा वाढला आहे.
#WATCH | Hyderabad, Telangana | Guinness World Records honour actor Chiranjeevi Konidela as ‘The Most Prolific Film Star In Indian Film Industry’ | Guinness World Records Adjudicator Richard Stenning says, " today guinness world records have announced the official announcement of… pic.twitter.com/RNePmqj4EU
— ANI (@ANI) September 22, 2024
हेही वाचा :
- दाक्षिणात्य अभिनेत्यांचा दानशुरपणा! चिरंजीवीसह महेश बाबूकडून पूरग्रस्तांसाठी 1 कोटी रुपयांची देणगी - flood relief in telangana and ap
- "भारतीय चित्रपटाचा ध्वज उंच फडकत राहो" म्हणत, चिरंजीवींनी केलं 'कल्की'च्या निर्मात्यांचं कौतुक - Kalki 2898 AD
- निवडणूक जिंकल्यानंतर पवन कल्याणचं कुटुंबीयांकडून जंगी स्वागत, चिरंजीवीच्या पायावर झाला नतमस्तक - Pawan Kalyan