हैदराबाद Chandrayaan 3 : भारताची चंद्र मोहीम यशस्वी झाल्यानंतरही चांद्रयान-3 च्या प्रज्ञान रोवरनं संशोधनाचं काम सुरूच ठेवलं आहे. चांद्रयान 3 च्या प्रज्ञान रोव्हरनं एक नवीन शोध लावला आहे. रोव्हरला त्याच्या लँडिंग स्टेशनजवळ चंद्रावर 160 किमी विवर सापडलं आहे. प्रज्ञान रोव्हरनं लावलेला नवीनतम शोध, भौतिक संशोधन प्रयोगशाळा, अहमदाबाद येथील शास्त्रज्ञांनी सायन्स डायरेक्टच्या ताज्या अंकात प्रकाशित केला आहे. प्रज्ञान रोव्हरनं पृथ्वीवर पाठवलेल्या डेटावरून नवीन विवर शोधण्यात आल्याचं अंकात म्हटलं आहे. रोव्हर सध्या दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करत आहे.
हा शोध विशेष का आहे? : प्रज्ञान रोव्हरनं गोळा केलेल्या डेटावरून चंद्रावर एक नवीन साइट शोधण्यात आली आहे. दक्षिण ध्रुवावरील एटकेन बेसिनपासून सुमारे 350 किमी दूर असलेल्या उंच भागातून रोव्हर जात असताना, त्याला चंद्राच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठं आणि सर्वात जुनं प्रभाव असलेल्या विवराचा शोध लागला. चंद्रावर सापडलेल्या या विवराच्या थरावरील धूळ आणि खडक चंद्राचा प्रारंभिक भूवैज्ञानिक विकास समजून घेण्यासाठी खूप मदत करू शकतो. त्यामुळं हा शोध महत्त्वाचा मानला जात आहे.
चंद्राच्या भूगर्भीय इतिहासाची मिळणार माहिती : रोव्हरनं त्याच्या ऑप्टिकल कॅमेऱ्यांद्वारे उच्च रिझोल्यूशनची छायाचित्रं घेतली आहेत. या छायाचित्रांमुळं प्राचीन विवराच्या संरचनेची महत्त्वाची माहिती मिळू शकते.यामुळं चंद्राच्या भूगर्भीय इतिहासाबाबतही महत्त्वाचं संकेत मिळतील, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. या विवरामुळं चंद्रावर भूतकाळातील माहिती सापडेल. हा नवीन शोध चंद्राच्या पृष्ठभागावरील सर्वात जुन्या भूवैज्ञानिक निर्मितींपैकी एक आहे. विवर त्यानंतरच्या आघातांमुळं निर्माण झालेल्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं, असं प्रसिद्ध अंकात म्हटलं आहे.
हे वाचलंत का :