ठाणे Journalists Shoved : या घटनेनंतर पत्रकार रामनगर पोलीस ठाण्यात भाजपा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता, पोलिसांनी चार तास पत्रकारांना पोलीस ठाण्यात ताटकत ठेवले. (Maratha reservation) या दरम्यान एका भाजपा मंत्र्यांचा पोलीस अधिकाऱ्याला फोन करून माझ्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करू नका म्हणून सांगितले. रामनगर पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा भाजपा कार्यकर्त्यावर दाखल केला. त्यामुळे जिल्ह्यातील पत्राकारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. (journalists abused)
मराठा आरक्षणामुळे दौरा वादग्रस्त: मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे वादग्रस्त ठरला आहे. एकीकडे राज्यभर मराठा समाजाच्या वतीनं नेत्यांना गावबंदी करण्यात आली असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची महाविजय-2024 अभियानांतर्गत रविवारी डोंबिवलीत चौक सभा झाली. या सभेत मराठा तरुणांनी 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
पोलिसांसमोरच घडला प्रकार: मराठा बांधव शिवाजी पाटील यांनी घोषणा दिल्या. हे पाहून बावनकुळे यांनी पाटील यांना मंचावर बोलावून त्यांना समजावून सांगितले. त्यानंतर पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलेल्या पत्रकारांना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. या घटनेमुळे उपस्थित पत्रकारांनी निषेध व्यक्त करत पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तब्बल चार तास बसवून ठेवल्यानंतर त्यांची तक्रार नोंदविण्यात आली. एकीकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ, धाक-धमक्या देत धक्काबुक्की केली, तर दुसरीकडे पोलिसांसमोरच हा प्रकार घडूनही पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती.
समाज माध्यमांवर तीव्र पडसाद: या घटनेची केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याने समस्त जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये पोलिसांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या घटनेचे समाज माध्यमांवर देखील तीव्र पडसाद उमटत आहेत. पत्रकारांनी निषेध व्यक्त केल्यानंतर या घटनेबद्दल भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी पत्रकारांची माफी मागितली. ही अक्षम्य चूक असल्याचेही त्यांनी मान्य केले. मात्र, पत्रकारांनीच त्याला सांगितले कि, तुम्ही पत्रकार कायद्यानुसार धक्कबुकी करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करा. जोपर्यत गुन्हा दाखल करत नाही. तोपर्यत आम्ही भाजपच्या कार्यक्रमाचे वृत्त संकलन करणार नसल्याची भूमिका घेतली.
बावनकुळेसह उपाध्याय यांनी मागितली पत्रकारांची माफी: त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांची माफी मागून पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली जाईल असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना आश्वासन दिले. मात्र या घटनेमुळे सरकारने पत्रकारांसाठी केलेल्या संरक्षण कायद्याचा भय खुद्द सत्ताधाऱ्यांनाच राहिला नसल्याचे दिसून आले. या घटनेचा जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा:
Andhra Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात; दोन ट्रेनची टक्कर; 6 प्रवाशांचा मृत्यू
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी शिर्डी राहणार बंद; साईबाबा मंदिर खुलं