ठाणे : जितेंद्र आव्हाड लवकरच छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर चित्रपट ( Jitendra Awhad Will Make a Film on Rajarshi Shahu Maharaj ) काढणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले, शाहू महाराज ( Show The History of Chhatrapati Shahu Maharaj ) व बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास ते दाखवणार आहेत. सध्या सुरू असलेल्या इतिहासाच्या विकृतीवरून आता खरा इतिहास चित्रपटातून दाखवणार असल्याचे आव्हाडांनी स्पष्ट केले आहे.
पुढच्या वर्षी हा चित्रपट नागरिकांच्या भेटीला येणार : पुढल्या वर्षात चित्रपट नागरिकांच्या भेटीला येणार असल्याचे जितेंद्र आव्हाडांनी यांनी सांगितले. तसेच, शाहू महाराज यांनी बहुजनांसाठी घेतलेली मेहनत आणि केलेले कार्य महाराष्ट्र व भारताच्या भेटीला आणणार, असेही ते म्हणाले. तर 8 भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित करणार आहे. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काहीही न दाखवता योग्य इतिहास नागरिकांना दाखवणार असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाडांवर झाला होता गुन्हा दाखल : राष्ट्रवादीचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा आरोप केला होता. आव्हाड यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४ अन्वये ठाण्यातील मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असताना आणि कार्यक्रम संपून एकनाथ शिंदे त्यांच्या गाडीतून परत जात असताना त्यांनी महिलेच्या खांद्यावर हात ठेवून इथे का? असा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. ती मध्यभागी उभी आहे का, बाजूला जा, असे करून त्याने तक्रारदाराला तेथून काढले आणि लोकांना कळलेही नाही. आव्हाड यांचा हेतू योग्य नसल्याचा आरोप महिलेने केला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.