मुंबई - ज्या तरुणाने त्याला माझ्यासमोर आणि माझ्या माणसांनी मारहाण केली अशी तक्रार केली, त्याला मी ओळखतही नसल्याची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली. माझ्या विरोधात गेली ३ वर्षे हा अभियंता नाही त्या पोस्ट करत असल्याचे त्यांनी सांगितले. ही गोष्ट माझे कार्यकर्ते मला अनेकदा सांगायचे, पण मी त्याकडे दुर्लक्ष केले .मी सतत २४ तास माझ्या मतदारसंघात आणि सोलापूर जिल्ह्यात कामात व्यग्र आहे, असे ते म्हणाले.
अभियंत्याला मारहाण हा प्रकार मला माध्यमांमार्फत कळाला असा खुलासा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्षेपार्हय पोस्ट टाकली म्हणून जितेंद्र आव्हाड यांचे संरक्षणात असलेल्या सरकारी पोलिसांनी अभियंत्याला उचलून आणले. यानंतर आव्हाड यांच्या विवियाना बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केली. तेदेखील आव्हाड यांच्या समोर आणि आव्हाड यांनीच मला पोस्ट डिलीट करायला लावली, अशी तक्रार ठाण्यातील एका तरुण अभियंत्याने दिली होती. यावर शेवटी जितेंद्र आव्हाड यांनी हा खुलासा केला.