ETV Bharat / state

शरद पवारांचा छळ केल्याचा बदला जनता घेईल, जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर

author img

By

Published : Oct 3, 2019, 4:37 PM IST

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हजर होते.

जितेंद्र आव्हाड

ठाणे - पोटच्या पोरांसाठी एका बापाने जे करावे, ते सर्व शरद पवारांनी माझ्यासाठी केले आहे, असे बोलताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाले. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हजर होते.

जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर

हेही वाचा - शरद पवारांचे सारथी झाले जितेंद्र आव्हाड

यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले, वयाच्या 80 व्या वर्षी ज्या इर्षेने आणि जिद्दीने शरद पवार जनतेमध्ये वावरत आहेत, त्याला तोड नाही. गेल्या काही दिवसात आपले खंदे नेते आपल्याला सोडून भाजपवासी झाले याचे दुःख पचवून हा माणूस खचून न जाता जनतेच्या भल्यासाठी उभा महाराष्ट्र पिंजून काढतोय, हे पाहून मन भरून येते, असे आव्हाड म्हणाले.

हेही वाचा - विद्यार्थीनीच्या परदेशात उच्च शिक्षणासाठी पोलीस बंदोबस्तात एनओसी

तब्बल 3 तास रणरणत्या उन्हात उभे राहून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याचा अर्ज भरण्यासाठी शरद पवार आले. हे पाहून आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते भावूक झाले. मागच्या 2 महिन्यांत ज्यांनी-ज्यांनी शरद पवारांना त्रास दिला आहे. त्यांना जनता धडा शिकवेल, असा विश्वासही आव्हाडांनी व्यक्त केला. शरद पवार यांच्यासोबत कन्हैया कुमार हे देखील या रॅलीमध्ये सहभागी होते.

Intro:आव्हाड का रडले?? आपल्या साहेबाला होणारा त्रास पाहून आव्हाड यांना अश्रू अनावर.. जनता धडा शिकवेलBody:
पोटच्या पोरांसाठी एका बापाने जे जे करावं ते सर्व पवार साहेबांनी माझ्यासाठी केलंय असे बोलत जितेंद्र आव्हाड ढसाढसा रडले. आपल्यासाठी पवार साहेबांच्या मनांत जे अतीव प्रेम त्याचे दर्शन होताच आव्हाडांना अश्रू अनावर झाले. कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातून जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार हे जातीने हजर होते. वयाच्या 80 व्या वर्षी ज्या इर्षेने आणि जिद्दीने शरद पवार जनतेमध्ये वावरत आहेत त्याला तोड नाही. गेल्या काही दिवसात आपले खंदे नेते आपल्याला सोडून भाजपवासी झाले याचे दुःख पचवून हा माणूस खचून न जाता जनतेच्या भल्यासाठी उभा महाराष्ट्र पिंजून काढतोय हे पाहून मन भरून येतं असं आव्हाड म्हणाले. तब्बल 3 तास रणरणत्या उन्हांत उभे राहून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याचा अर्ज भरण्यासाठी आले हे पाहून आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते भावूक झाले होते. मागच्या दोन महिन्यात ज्यांनी ज्यांनी आव्हाड साहेबांना त्रास दिला आहे त्यांना जनता जनार्दन हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज पवार यांचे ठाण्यात आगमन होताच सर्व नेते आणि कार्यकर्ते यांच्या मध्ये चैतन्याचे वातावरण पहायला मिळत होते. पवार यांच्यासोबत कन्हय्याकुमार देखील या रॅली मध्ये सहभागी झाला होता. सध्या नवरात्री चे दिवस असल्याने आव्हाड यांनी आई तुळजाभवानी चे आशीर्वाद घेऊन शक्तिप्रदर्शन करत शरद पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.