ठाणे - पळपुटे कोण? या सामना लेखावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत. शरद पवार हे राजकारणातले भीष्म आहेत. कारण, गेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्रातीलच नाही, तर देशातील राजकारण शरद पवारांच्या भोवती फिरत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, विरोधक, बाळासाहेबांनंतरची पिढी शरद पवारांवर टीका करत आहे, असा टोला आव्हाडांनी लगावला आहे.
हेही वाचा - भाजपच्या 240 पेक्षा जास्त जागा येतील - गिरिश महाजन
तर नितीन गडकरी सारखे आरक्षणा बद्दल का? बोलतात नेमकं त्यामागे काय आहे माहित नाही. पण, देशात आरक्षण नसावे, हा आरएसएसचा अजेंडा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नामदेव ढसाळ यांच्या सारख्यांवर बापजाद्यांची पुण्याई नव्हती. कारण जेव्हा तुम्ही शाळेत शिकत होता, तेव्हा आमचे बापजादे गुरे-ढोर राखत मैला उचलत होते. आम्हाला म्हणजे मागासवर्गीय समाजाला अक्षर ओळख व्हायला 5 हजार वर्षे लागली. गेली कित्येक वर्षे देशांतील 80 टक्के मागासवर्गीय समाज गावकुसा बाहेर ठेवला गेला होता. याचा विचार कधी तरी करा, अशा शब्दात आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी नितीन गडकरींच्या आरक्षण मुद्दयांवर सडकून टिका केली.
हेही वाचा - ठाण्यातील मराठी-गुजराथी वाद : पाच दिवसानंतर परस्परविरोधी मारहाणीचा गुन्हा दाखल
'जे राष्ट्रवादी पक्ष सोडून गेले त्यांनी आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवला' अशी टीका शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर केली होती, यावर शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये जळजळीत टीका करण्यात आली होती. जे आज राष्ट्रवादीमधून बाहेर पडले ते तुमचे कधी नव्हतेच व ते इतर पक्षातून फुटूनच आले होते. ते कसे चालले व स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे पवार देखील सोनिया गांधींच्या काँग्रेसमधूनच बाहेर पडले होते ना? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून केला गेला होता.
इतिहास काढायचा झाला तर आम्हाला काढता येतो. 1977 चा इतिहास काढला तर सर्वांनाच त्रास होईल. पण, जखमेवरची खपली काढायची नसते. इतिहासाचे दाखले द्यायचे झाले तर अनेक रक्तवाहिन्या भळा-भळा वाहतील. स्वाभीमानाच्या गोष्टी कोणीही करायच्या नसतात शरद पवारांचा स्वाभिमान इंदिरा गांधी, मुरली देवरा, मनोहर जोशी, सुधीर जोशी यांना माहिती होता, या शब्दात आव्हाडांनी सामनातील लेखावर टिका केली.
हेही वाचा - अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात जागावाटपावरून युतीत रस्सीखेच
गेली 5 दशके अनेक नेते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करूनच मोठे झाले आहेत. अनेकांनी आपली बुडणारी राजकीय कारकीर्द एकट्या पवार साहेबांवर टीका करून सावरली. तरीही साहेब आपल्या जागी अढळ आहेत, असे खरमरीत उत्तर आव्हाड यांनी सामना मधील टीकेला दिले.
हेही वाचा - भिवंडीत कपड्यांच्या गोदामांना भीषण आग; चार गोदामे जळून खाक