ETV Bharat / state

मनोहर पर्रीकर म्हणजे राफेल प्रकरणाचा पहिला बळी, जितेंद्र आव्हाडांची वादग्रस्त प्रतिक्रिया - राष्ट्रवादी

मनोहर पर्रीकर म्हणजे राफेल प्रकरणाचा पहिला बळी, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

मनोहर पर्रीकर म्हणजे राफेल प्रकरणाचा पहिला बळी, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
author img

By

Published : Mar 18, 2019, 8:01 PM IST

Updated : Mar 18, 2019, 8:35 PM IST

ठाणे - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन हा राफेल प्रकरणाचा पहिला बळी आहे, अशी धक्कादायक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये. पण हे वास्तव आहे, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

राफेलची बोलणी सुरु झाल्यानंतर पर्रीकर अस्वस्थ झाले. दिल्लीचे राजकारण आपल्याला जमणार नाही, हे त्यांनी ओळखले. त्यामुळेच त्यांनी गोव्यात परतून मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनातल्या वेदना त्यांनी अनेक मित्रांना बोलून दाखवल्या होत्या. माझ्या मताप्रमाणे हा राफेलचा पहिला बळी आहे, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

मनोहर पर्रीकर म्हणजे राफेल प्रकरणाचा पहिला बळी, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

रविवारी संध्याकाळी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गोव्यावरच नाही तर देशावरही शोककळा पसरली. ते संरक्षणमंत्री असतानाच लष्कराने पहिला सर्जिकल स्ट्राईक केला. गेल्या वर्षभरापासून त्यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासले होते. त्याही अवस्थेत त्यांनी कर्करोगाशी झुंज दिली. मात्र ही झुंज अखेर संपली. आज अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना निरोप देण्यात आला. मात्र मनोहर पर्रीकर यांच्या निधनाबाबत प्रतिक्रिया विचारली असता जितेंद्र आव्हाड यांनी मात्र हा राफेलचा पहिला बळी असल्याचे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Intro:
मनोहर पर्रिकर म्हणजे राफेल प्रकरणाचा पहिला बळी-जितेंद्र आव्हाडBody:
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन हा राफेल प्रकरणाचा पहिला बळी आहे अशी धक्कादायक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांन दिली आहे. गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये. पण हे वास्तव आहे असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. राफेलची बोलणी सुरु झाल्यानंतर पर्रिकर अस्वस्थ झाले. दिल्लीचं राजकारण आपल्याला जमणार नाही हे त्यांनी ओळखलं. त्याचमुळे त्यांनी गोव्यात परतून मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनातल्या वेदना त्यांनी अनेक मित्रांना त्यांनी बोलून दाखवल्या होत्या. माझ्या मताप्रमाणे हा राफेलचा पहिला बळी आहे अशी धक्कादायक प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
रविवारी संध्याकाळी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर गोव्यावरच नाही तर देशावरही शोककळा पसरली. ते संरक्षण मंत्री असतानाच लष्कराने पहिला सर्जिकल स्ट्राईक केला. गेल्या वर्षभरापासून मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासले होते. त्यांनी त्याही अवस्थेत कर्करोगाशी झुंज दिली. मात्र ही झुंज अखेर संपली, आज अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना निरोप देण्यात आला. मात्र मनोहर पर्रिकर यांच्या निधनाबाबत प्रतिक्रिया विचारली असता, जितेंद्र आव्हाड यांनी मात्र हा ऱाफेलचा पहिला बळी असल्याचं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Conclusion:
Last Updated : Mar 18, 2019, 8:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.