ठाणे - वरिष्ठ आयपीएस अधिकारी जयजित सिंह यांनी ठाणे पोलीस आयुक्तपदी काल नियुक्ती झाल्यानंतर आज आपला पदभार सांभाळला. आधीचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची पोलीस महासंचालकपदी (गृहनिर्माण) पदोन्नती झाली होती. यामुळे आयुक्त पदासाठी अनेकांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, काल (सोमवारी) रात्री जयजीत सिंह यांच्या नावाच्या घोषणा करण्यात आली.
जयजीत सिंह होते एटीएस प्रमुख -
जयजीत सिंह 1990च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते पोलीस आयुक्तपदाआधी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पक्षाचे प्रमुख होते. सिंह यांच्या जागी आता गृहविभागाचे प्रधान सचिव असलेले विनीत अग्रवाल हे घेतील. तर आयपीएस अधिकारी संजय सक्सेना हे गृह विभागाचे नवीन प्रधान सचिव असतील. प्रधान सचिव (गृह) असलेले अग्रवाल यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाचे विशेष संचालक होते. त्यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त (मध्य प्रदेश) यांच्यासह शहरातील अनेक पदे भूषविली. विवेक फळसणकर यांच्या बदलीनंतर ठाणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार आयपीएस अधिकारी सुरेश मेखला यांच्याकडे होता.
हेही वाचा - 'राज्यपाल फाईलवर सही करतील तेव्हा संपूर्ण राज्यभवनाला पेढे वाटू'
जयजीत सिंह काय म्हणाले?
आज कोणतीही प्रतिक्रिया नाही. आज आपण आपल्या पदाचा पदभार घेत असून लवकरच पत्रकारांसोबत मन मोकळ्या गप्पा मारू, अशी माहिती यावेळी जयजीत सिंह यांनी माध्यमांना दिली.
अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बजावली सेवा -
सिंह यांच्या नेतृत्वात एटीएसने मनसुख हिरेन खून प्रकरणात दोन जणांना अटक केली होती. या खटल्याचा तपास करीत असलेले निलंबित पोलीस अधिकरी पोलिस सचिन वाझे यांच्यावरील आरोपानंतर हे प्रकरण महाराष्ट्र एटीएसकडे वर्ग करण्यात आले होते. नंतर हे प्रकरण एटीएसकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आले.
हेही वाचा - लसीकरण लवकर पूर्ण करण्यासाठी राज्याने ग्लोबल टेंडरला काढले, मात्र प्रतिसाद नाही - राजेश टोपे