ठाणे : 2012 पासून, विद्या प्रसारक मंडळ, ठाणेच्या के. जी. जोशी बेडेकर महाविद्यालयाने जपानी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी जपानमधील महाविद्यालयासोबत सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत दरवर्षी जपानी विद्यार्थ्यांना काही दिवसांसाठी ठाण्यात आणले जाते, तर ठाण्यातील काही विद्यार्थ्यांना जपानमध्ये राहण्यासाठी पाठवले जातात.
एकमेकांच्या देशाबद्दलचे गैरसमज दूर : एकमेकांच्या देशाबद्दलचे गैरसमज दूर करून त्या-त्या देशाच्या परंपरा, संस्कृतीची माहिती करून घेणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. का कार्यक्रम अतिशय उपयुक्त असल्याचे कार्यक्रमाच्या समन्वयकांनी सांगितले. या कार्यक्रमांतर्गत सध्या काही जपानी विद्यार्थी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी ठाणे महाविद्यालयात आल्याचे समन्वयकांनी सांगितले.
भारतीय संस्कृती तसेच परंपरेचे धडे : भारत अतिशय मागासलेला देश असल्याचा विचार मनात घेऊन आलो होतो. मात्र, येथील प्रगती, धार्मिक स्थळे पाहून थक्क झालो असे मनोगत समन्वयक क्योटो निशिका यांनी व्यक्त केले आहे. ठाण्यात आलेल्या जपानी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती तसेच परंपरेचे धडे देण्यात येत आहे. दोन्ही देशातील संस्कृतीची ओळख करुन घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या के. जी. जोशी बेडेकर कला, वाणिज्य महाविद्यालयात जापानी विद्यार्थी भारतीय संस्कृती, परंपरांचा अभ्यास करत आहेत.
जापानी विद्यार्थी शिकतात योगा : येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम महाविद्यालयात योग शिकवला जातो. कारण योगामुळे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक संरचना देखील सुधारते असे म्हटले जाते. यावेळी बोलताना डॉ. सुधाकर आगरकर म्हणाले की, या दौऱ्यात विद्यार्थ्यांना मुंबईसह ग्रामीण भागात सहलीसाठी नेण्यात येत आहे. त्यांना भारताच्या जनजीवनाची माहिती मिळण्यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
भारताबद्दल अनेक गैरसमज : या दौऱ्याचे समन्वयक क्योटो निशिका यांनी सांगितले की, भारताबद्दल आमच्या मनात अनेक गैरसमज होते. भारत अत्यंत अस्वच्छ आहे, भारतातील नागरिक वेळा पाळत नाहीत, असे समज आमच्या मनात होते. ते आज येथे आल्याने दुर झाल्याचे निशिका यांनी सांगितले. भारताची वेगळी संस्कृती, सामाजीक बांधिलकी, एकता देशात पहायला मिळाल्याने आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो, असे ते म्हणाले. तसेच चंद्रमोहीम यशस्वी झाल्याने या विद्यार्थ्यांनाही भारताबद्दल अधिक उत्सुकता वाटू लागली आहे.