ETV Bharat / state

Thane Crime : भिवंडीत मृत अवस्थेत 'अर्भक' आढळल्याने परिसरात खळबळ ; अनैतिक संबंधातून जन्म दिल्याचा संशय - खोणी गावाच्या हद्दीत मृत अवस्थेतील अर्भक आढळून आले

भिवंडी शहरा नजीक खोणी गावाच्या हद्दीत एका बंद पडलेल्या कारखान्याच्या भिंतीलगत असणाऱ्या झाडाझुडपात अर्धवट वाढ झालेले मृत अवस्थेतील नवजात 'नकोशी' स्त्री-जातीचे अर्भक ( Infant found dead situation ) आढळून आल्याने परिसरात खळबळ ( Infant found dead situation at Bhiwandi ) माजली आहे. अनैतिक संबंधातून जन्म दिल्याचा संशय व्यक्त केला जात असून याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Infant found dead situation
अर्भक आढळले
author img

By

Published : Dec 28, 2022, 7:05 PM IST

ठाणे : जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भिवंडी शहरानजीक खोणी गावाच्या हद्दीत मृत अवस्थेतील नवजात 'नकोशी' स्त्री-जातीचे अर्भक आढळून ( Infant found dead situation at Bhiwandi ) आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेची नोंद निजामपूरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अनैतिक संबंधातून हे अर्भक ( Infant found dead situation ) जन्माला आल्याने मातृत्व लपवण्यासाठी फेकले असावे असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

नवजात बालिकेचा मृतदेह तपासणी : भिवंडी शहरातील खोणी गावाजवळील एका बंद पडलेल्या कारखान्याच्या भिंतीलगत असणाऱ्या झाडाझुडपात अर्धवट वाढ झालेले मृत अवस्थेतील नवजात बालक आज आढळून आले. या घटनेची माहिती खोणी गावचे पोलीस पाटील दिलीप बाळाराम पाटील यांना कळताच, त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर निजामपूरा पोलीस ठाण्यात खबर दिल्याने पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृत नवजात बालिकेचा मृतदेह उत्तरणीय तासपाणी साठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.

अनैतिक संबंधाचे प्रकरण असल्याचा अंदाज : दरम्यान निजामपूर पोलिसांनी पोलीस पाटील यांच्या तक्रारी वरून भादंवि कलम ३१८ अन्वये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. खळबळजनक बाब म्हणजे कारखाना क्र.२१३५ जवळील झाडाझुडपात अर्धवट वाढ झालेल्या मृत अवस्थेत फेकलेल्या नवजात स्त्री-जातीच्या अर्भकाचे पालनपोषण नाकारण्याच्या हेतूने अथवा अनैतिक संबंध लपवण्याचा हेतूने अर्भक फेकले असावे असा दाट संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि आर.जे धोंडगा करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.