ETV Bharat / state

Year Ender Bhiwandi 2021 : यंत्रमाग नगरीतील उद्योग डबघाईला, अग्नी तांडवच्या घटनेने सरत्यावर्षाला अलविदा

भिवंडी शहराची ओळख यंत्रमाग नगरी म्हणून संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे भिवंडी शहरात तयार झालेला कापड विविध मोठमोठ्या ब्रँडच्या नावे विक्रीस तयार होत असतो. (loom Industry In Bhiwandi ) लॉकडाउन पूर्वी १२ लाखांच्यावर यंत्रमाग कारखाने होते. मात्र, त्यानंतर निम्म्याहून अधिक कारखान्यापैकी काही भंगारात विकले गेले आहेत.

Year Ender Bhiwandi 2021
भिवंडी
author img

By

Published : Dec 27, 2021, 7:32 AM IST

Updated : Dec 29, 2021, 2:11 PM IST

ठाणे - यंत्रमाग नगरी म्हणून भिवंडी शहराची ओळख आहे. या नगरीत लाखो यंत्रमाग कारखाने असून कापड उद्योगनगरी म्हणून देशाच मॅंचेस्टर शहर म्हणूनही ओळखले जाते.(Textile industry) मात्र, कोरोना काळात येथील कापड उद्योगाला आलेले आर्थिक मंदीचे सावट आणि वाढत्या जीएसटीमुळे डबघाईला आला आहे. तर, कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या (loom Industry In Bhiwandi ) या नगरीत काँग्रेस पक्षाला घरघर लागली (Textile Industry Bhiwandi City) असून गटबाजीमुळे कॉंग्रेसचे लोकप्रतिनिधी सत्तेसाठी राष्ट्रवादीच्या छावणीत दाखल झाले. शिवाय सतत घडत असलेल्या अग्नी तांडवच्या घटनांमुळे उद्योगाला फटका बसला आहे. त्यामुळे सरत्या वर्षीतही हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून यंत्रमाग (Fire at Bhiwandi cloth shop) नगरीला आर्थिक फटका देऊन जाणारे सरतेवर्ष ठरले आहे. तर पहिल्यादांच जिल्ह्यातील भिवंडी लोकसभेच्या खासदारांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्याने भाजपाला राजकीय लाभ मिळाला आहे.

  1. भिवंडी शहराची ओळख यंत्रमाग नगरी म्हणून संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे भिवंडी शहरात तयार झालेला कापड विविध मोठमोठ्या ब्रँडच्या नावे विक्रीस तयार होत असतो. लॉकडाउन पूर्वी १२ लाखांच्यावर यंत्रमाग कारखाने होते. मात्र, त्यानंतर निम्म्याहून अधिक कारखान्यापैकी काही भंगारात विकले. तर, काही बंद अवस्थेत पडून आहेत. सध्याच्या घडीला ३ लाखांच्या जवळपास यंत्रमाग कारखाने सुरु आहेत. त्यातच धागे, कच्चा कपडा , यावर भरमसाठ २४ टक्के जीएसटी करात पुन्हा वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला सुरु असलेले यंत्रमाग कारखाने, सायजींग कंपन्या डबघाईला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
  2. भिवंडी शहर व ग्रामीण भागात मोठमोठे लाखो स्क्वेअर फुटचे लाखो गोदामे आहेत. यामध्ये अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, बी.एम.डब्ल्यू, मर्सिडीज, मारुती, टोयोटा, सारख्या विविध कंपन्यांचे साठवणूक केलेले गाड्या व साहित्य या ठिकाणी गोदामांमध्ये साठवून ठेवतात. मग या ठिकाणाहून देशातील व राज्यातील विविध शहरांमध्ये पोहचवले जातात. परंतु, मागील अनेक वर्षांपासून भिवंडी कापड उद्योगाला मंदी आल्याने जीएसटी व विविध कर प्रणालीमुळे कापड व्यापारी आता कापड उद्योग सोडून इतर व्यवसायांमध्ये आपली नवीन सुरुवात करत आहे. भिवंडीची यंत्रमाग नगरीची ओळख यामुळे पुसली जाणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी पुढाकार घेऊन भिवंडीच्या कापड उद्योग असलेल्या यंत्रमाग नगरीला डबघाईला जाण्यापासून वाचवले पाहिजे. अशी मागणी सरत्या वर्षात पुढे आली आहे.
  3. कॉंग्रेस भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष पदावर तब्बल नऊ वर्षांपासून कार्यरत शोएब खान गुड्डू यांची शहर अध्यक्ष पदावरून महाराष्ट्र काँग्रेस पक्षाने उचलबांगडी करून अध्यक्ष म्हणून माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांची नियुक्ती केल्याने भिवंडी महानगरपालिकेचे २१ कॉग्रेस नगरसेवकांसह पदाधिकारी यांच्याकडून रशीद ताहीर मोमीन यांच्या नियुक्तीस विरोध करीत बंड पुकारले होते. दुसरीकडे भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेसचे ४७ नगरसेवक होते. त्यापैकी १८ नगरसेवकांनी महापौर निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराविरोधात मतदान करीत बंडखोरी केली होती. आता बंडखोर नगरसेवकांनी राष्ट्रवादीची वाट धरली तर त्यापाठोपाठ कॉगेस जिल्हा अध्यक्ष शोएब खान गुड्डू हेही राष्ट्रवादीच्या गोटात पदाधिकाऱ्यासह सामील झाले. तर, कॉंग्रेसचे सध्याचे अध्यक्ष माजी आमदार रशीद ताहीर यांच्या नियुक्ती विरोधात काँग्रेस नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यात प्रचंड रोष असल्याचे दिसून आले आहे. एकंदरीतच कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भिवंडी कॉंग्रेसला गटबाजीमुळे घरघर लागली आहे.
  4. भिवंडीत मोठ्या प्रमाणात नागरीवस्तीमध्ये बेकादेशीर मोती कारखाने आहेत. शिवाय लाखोंच्या संख्यने असलेल्या गोदामांमध्ये अत्यंत ज्वलनशील असे अतिधोकादायक केमिकल व साहित्य असलेला साठा केला जातो. या केमिकल तसेच ज्वलनशील साठ्यांना वारंवार आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. सरत्यावर्षात लहान मोठ्या सुमारे १५० आगीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या ५ वर्षांत आगीच्या घटनेत १२ जणांनी जीव गमावला लागला. तर, सरत्यावर्षात १ महिलेचा आगीच्या घटनेत मृत्यू झाला. सतत लागणाऱ्या आगीमुळे कोट्यवधीचे नुकसान झाले. यामुळे यंत्रमाग कारखाने व गोदामांना वारंवार आग लागण्याचे सत्र सुरू असून भिवंडीतील अग्नी तांडव थांबणार कधी? असा प्रश्न सरत्यावर्षातही उपस्थित झाला आहे.
  5. एमआयएमचे जिल्हा माजी अध्यक्ष खालिद गुड्डू यांच्यावर सरत्यावर्षात ५ खंडणीचे गुन्ह्यासह एक अत्याचारा गुन्हा दाखल झाला होता. शिवाय गोदाम पट्टयात चोऱ्या, घरफोड्याचे प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. वर्षभरात अंदाजे दोन हजाराच्यावर लहान मोठ्या चोऱ्या, घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यापैकी पोलिसांनी निम्म्याहून अधिक गुन्ह्याची उकल केली आहे. मात्र, आजही घरफोडी व चोरीचे गुन्हे घडतच आहेत. त्यामुळे पोलिसांनी अश्या गुन्हेगारीला आळा घालवा अशी मागणी सरत्या वर्षात केली जात आहे.
  6. धोकादायक इमारतीचा पुनःर्वसनाचा प्रश्नही अनेक वर्षापासून रखडल्याने गेल्याच वर्षी पटेल नगरमधील जिलानी इमारत कोसळून ३८ जणांचा जीव गेला होता. तर, यावर्षभरात घडलेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सरत्या वर्षातही लाखो नागरिक राहत असलेल्या धोकादायक व अनधिकृत इमारतीचा प्रश्न जैसे थे आहे.
  7. बायकोच्या चारित्र्याचा संशय घेणाऱ्या नवऱ्यानेच भर रस्त्यात मटण कापण्याच्या सुऱ्याने गळ्यावर वार करत तिची हत्या ( Husband kills wife in Bhiwandi ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे, बायको रक्ताच्या थारोळ्यात पडली असतानाच नवऱ्याने वऱ्हाळ तलावात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी पाण्यात उड्या मारून त्याला वाचवत भिवंडी शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आनंद वाघमारे असे बायकोची हत्या करून स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी नवऱ्याचे नाव आहे.
  8. हौसेला मोल नसते या म्हणीचा प्रत्यय भिवंडी तालुक्यातील वडपे या गावामध्ये आला आहे. या गावतील शेतकरी उद्योजक जनार्दन भोईर यांनी चक्क कोणतीही महागडी कार खरेदी न करता थेट आकाशाला गवसणी घालणारे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. हा संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे हेलिकॉप्टर घेणारा हा शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्धव्यवयाय करतो.
  9. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निकोटीनयुक्त हुक्का फ्लेवर वापरले जात असल्याने युवा पिढी नशेच्या आहारी जात आहे. त्यातच भिवंडीत गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत महाराष्ट्रात प्रतिबंधित निकोटीनयुक्त 'अफजल' व 'सोएक्स हर्बल' या हुक्का फ्लेवरचा साठा जप्त केला आहे. या साठ्याची किंमत तब्बल 9 कोटी 36 लाख 78 हजार 520 रुपये आहे.
  10. भिवंडी लोकसभेमधून दुसऱ्यांदा निवडून गेलेले भाजपचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रीमंडळात पंचायत राज राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा एका खासदाराची नियुक्ती केली. शिवाय आगरी समाजाचे खासदार म्हणून त्यांना मंत्री मंडळात घेण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते. एकंदरीतच राजकीयदृष्ट्या भाजपाला भिवंडी पट्यात फायदा झाला आहे.

हेही वाचा - Year Ender 2021 : आघाडी सरकारची राज्यपालांशी फारकत ठरतेय डोकेदुखी

Last Updated : Dec 29, 2021, 2:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.