ETV Bharat / state

Students Stuck in Ukraine : युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी बर्फ वितळून पिताहेत पाणी; तीन दिवसांपासून जेवणाचे हाल

author img

By

Published : Mar 6, 2022, 5:22 PM IST

रशिया युक्रेन युद्धाच्या ( Russia Ukraine War ) भयावह परिस्थितीत युक्रेनमध्येच्या सुमी शहरात गेल्या ११ दिवसांपासून भारतीय विद्यार्थी अडकले ( Students Stuck in Ukraine ) आहेत. याच विद्यार्थ्यांमध्ये मुरबाडमधील शुभम म्हाडसे हा एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणारा विद्यार्थी आहे. प्रत्येक तासाला या ठिकाणी रशियाकडून हल्ले होत आहेत. शिवाय विद्यार्थ्यांचे खाण्या-पिण्याचे मोठे हाल होत असून पाणी नसल्याने बर्फ वितळून त्याचे पाणी पिण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली ( Drink Water after Melting Ice ) आहे, असा व्हिडिओ शुभमने पाठवला आहे. तो या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर आम्हाला भारतात घेऊन चला, अशी विनंती भारत सरकारला करत आहे.

विद्यार्थी
विद्यार्थी

ठाणे - रशिया युक्रेन युद्धाच्या ( Russia Ukraine War ) भयावह परिस्थितीत युक्रेनमध्येच्या सुमी शहरात गेल्या ११ दिवसांपासून भारतीय विद्यार्थी अडकले ( Students Stuck in Ukraine ) आहेत. याच विद्यार्थ्यांमध्ये मुरबाडमधील शुभम म्हाडसे हा एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणारा विद्यार्थी आहे. प्रत्येक तासाला या ठिकाणी रशियाकडून हल्ले होत आहेत. शिवाय विद्यार्थ्यांचे खाण्या-पिण्याचे मोठे हाल होत असून पाणी नसल्याने बर्फ वितळून त्याचे पाणी पिण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली ( Drink Water after Melting Ice ) आहे, असा व्हिडिओ शुभमने पाठवला आहे. तो या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर आम्हाला भारतात घेऊन चला, अशी विनंती भारत सरकारला करत आहे.

युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी बर्फ वितळून पिताहेत पाणी

आमदाराने संपर्क साधून दिला धीर - मुरबाड तालुक्यातील शुभम म्हाडसे हा युक्रेनच्या सूमी शहरात अडकून पडला आहे. त्याने एक व्हिडिओ व्हायरल करत भारत सरकारला ( Government of India ) मदतीसाठी हाक दिली होती. त्यानंतर मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी शुभमशी संपर्क करत केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे तुझ्यासह इतर विद्यार्थ्यांनाही मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. मी तुझ्या आईवडिलांची भेट घेतली आहे, तू लवकरच घरी येशील, असे आश्वासन आमदार किसन कथोरे ( MLA Kisan Kathore ) यांनी शुभमला दिले.

शुभमला पाहण्यासाठी आईचे डोळे आतुरले - शुभम शेतकरी कुटूंबातील असून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शुभम युक्रेनच्या सुमी शहरात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेली सहा वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्यातच युक्रेनवर सतत होत असलेल्या हल्ल्यामुळे मोठे आवाज येत असल्याचे शुभमने आईवडिलांना सांगितले. शुभमला लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी आईवडिलांनी सरकारकडे मागणी केली आहे. जिल्ह्यातील 37 विध्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेले. त्यापैकी बहुतांश विद्यार्थी घरी परतले. आता युद्धाचा अकरावा दिवस उलटणार आहे. मात्र, मुरबाडचा शुभम कधी परत येईल याची वाट बघत शुभमची आई डोळे लावून बसली आहे.

अकरा दिवसांपासून मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत - शुभमसह इतरही भारतीय विद्यार्थी सुमी शहरापासून रशिया सीमा 50 किलोमीटर लांब आहे. या ठिकाणाहून केंद्र सरकारने लवकरात लवकर बाहेर काढावे, अशी विनंती शुभमच्या वडिलांनी केंद्र सरकारला केली आहे. केंद्र सरकाराने तयार केलेल्या विद्यार्थांच्या परतीच्या यादीत शुभमचे नाव नसल्यामुळे तो युक्रेनच्या सुमी शहरात 11 दिवसापासून अडकून पडल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - औषध देण्यास नकार दिल्याच्या वादातून नशेखोरांकडून मेडिकलची तोडफोड; घटना सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.