ठाणे - ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अश्लील धिंगाणा घालणाऱ्या लेडीज बारवर शेकडो महिलांनी हल्लाबोल करीत बार बंद पाडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्थानकासमोर असलेल्या सत्यम लेडीज बारमध्ये घडली. महिलांनी बार बंद करण्यासाठी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहून परिसरात एकच गोधंळ उडाला होता.
बार मालकाच्या दादागिरीसह मद्यपींच्या त्रासामुळे हल्लाबोल
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत १०० च्यावर लेडीज बार आहेत. यामध्ये सर्वाधिक लेडीज बार मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून त्या खालोखाल कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. यापैकी कल्याण पूर्वेतील सत्यम लेडीज बार उशिरापर्यत सुरू राहत व या बार मालकाची दादागीरी वाढली होती. शिवाय येथे येणारे मद्यपी परिसरातील महिलांना वाईट नजरे पाहतात. त्यामुळे, बार मधील महिला आणि परिसरातील महिला यांच्यात काहीच फरक राहिला नसल्याचा आरोप माजी नगरसेविका निर्मला रायभोळे यांनी केला. याच जाचाला कंटाळून अखेर शेकडो महिलांनी एकत्र येत आज सायंकाळच्या सुमारास या बारवर हल्लाबोल करून बार बंद पाडला.
हेही वाचा - चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी