ETV Bharat / state

मीरा भाईंदर : चोरीच्या प्रकरणातील आरोपी पोलीस ठाण्यातून पसार

एका गुन्ह्यातील आरोपी नया नगर पोलीस ठाण्यातून पसार झाला आहे. आज पहाटे पाच वाजता शौचालयासाठी गेलेल्या आरोपीने ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला. यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. पोलिसांनी आरोपीला चोरीच्या घटनेमध्ये ताब्यात घेतले होते.

Accused absconding Mira Bhayander
नया नगर पोलीस ठाणे आरोपी फरार
author img

By

Published : Jan 25, 2021, 3:47 PM IST

Updated : Jan 25, 2021, 9:03 PM IST

ठाणे - एका गुन्ह्यातील आरोपी मीरा भाईंदर येथील नया नगर पोलीस ठाण्यातून पसार झाला आहे. आज पहाटे पाच वाजता शौचालयासाठी गेलेल्या आरोपीने ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला. यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. पोलिसांनी आरोपीला चोरीच्या घटनेमध्ये ताब्यात घेतले होते. समीर अकबर शेख, असे फरार आरोपीचे नाव आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - डोंबिवलीत आज राष्ट्रीय कन्यादिनी मुलींच्या नावाने वृक्षारोपण

समीरने शौचालयामधील खिडकीतून उडी मारून पळ काढला. यामुळे पोलिसांच्या कामगीरीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. नया नगर पोलीस या आरोपीला शोधत आहे. मात्र, ९ तास उलटून देखील पोलिसांना त्याचा शोध लागलेला नाही. याप्रकरणी नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकूण तीन पथकांमार्फत त्याचा शोध सुरू आहे. समीरवर विविध पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. समीरला लवकरच अटक करू, असे नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी सांगितले.

हेही वाचा - वसतिगृह कर्मचारी संघटनेचा इगतपुरी ते मुबंई पायी मोर्चा शहापुरात दाखल

Last Updated : Jan 25, 2021, 9:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.