ETV Bharat / state

Kapil Patil : सरपंच ठेकेदार असेल तर विकासकामे चांगली होतील; केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे वादग्रस्त विधान

जलजीवन योजनेंतर्गत भिवंडी तालुक्यातील 196 गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी 13 गावांमध्ये जलकुंभाचे भूमिपूजन पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी अंबाडीतील भूमिपूजनाच्या वेळी ‘सरपंच’ कंत्राटदार असल्यास विकासकामे अधिक चांगली होतील, असे विधान केले आहे.

Kapil Patil
Kapil Patil
author img

By

Published : Feb 26, 2023, 5:18 PM IST

केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील

ठाणे : जलजीवन योजने अंतर्गत भिवंडी तालुक्यातील १९६ गावांचा पाणीप्रश्न निकालीकाढण्यासाठी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते १३ गावांमध्ये जळकुंभांचे भूमिपूजन कऱण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी 'सरपंच'च ठेकेदार असेल तर विकास कामे अधिक चांगली होणार असल्याचे विधान अंबाडी येथे भूमिपूजना वेळी केले आहे. वास्तविक महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३८ च्या कलमात सरपंचाचे अधिकार व कर्तव्ये संबंधी माहिती राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली. मात्र त्यामध्ये सरपंचांनीच कामाचा ठेका घेण्याचा उल्लेख नसल्याने त्यांच्या विधानावर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

हर घर जल,हर घर नळ : केंद्र शासनाने पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी ''हर घर जल,हर घर नळ"या ब्रीदवाक्याला अनुसरून ग्रामीण भागातील तळागाळातील खेड्यापाडयातील सर्वसामान्यांसाठी पंचायत समित्यांच्या अंतर्गत ग्रामपंचायतींमार्फत 'जलजीवन योजना' अंमलात आणली आहे. या योजने अंतर्गत २०२४ पर्यंत घराघरात नळजोडणी करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. दरम्यान भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात एकूण १२१ ग्रामपंचायती आहेत. या १२१ ग्रामपंचायतीमधील २१८ गावांपैकी १९६ गावांचा जलजीवन योजने अंतर्गत पाणीप्रश्न मिटणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी शनिवारी ३ गावांच्या दौऱ्या दरम्यान दिली.

जलकुंभांचा भूमिपूजन सोहळा : भिवंडी तालुक्यात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत शनिवारी जलकुंभांचा भूमिपूजन सोहळा कपिल पाटील यांच्या हस्ते केवणी, दिवे, कोपर, वडूनवघर, टेंभिवली, जू नांदुरखी, कांबे, खोणी, कवाड नाका, अनगाव नाका, आवले, अंबाडी, झिडके या १३ गावांमध्ये पार पडला. या दौऱ्यानिमित्त पाटील जुनांदुरखी येथे म्हणाले की,ग्रूप ग्रामपंचायत जुनांदुरखी-टेंभवली ही मुलुंडचे खासदार मनोज कोटक यांनी दत्तक घेतली असून त्यांच्या वार्षिक खासदार निधीतून ५ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता देवून कामे पूर्ण करण्यासाठी संग्राहक व जिल्हा नियोजन अधिकारी आणि महेंद्र कोटक यांची बैठक घेवून चर्चा करणार असल्याचे सांगून या गावातील नागरिकांनी कामांच्या माहितीचा आराखडा तयार करून त्या कामांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी कपिल पाटील ग्रूप ग्रामपंचायत जुनांदुरखी-टेंभवली ग्रामस्थांना केले आहे.

१९६ गावांच्या पाण्याची तहान भागणार : केंद्र शासनाच्या 'हर घर नळ' योजनेचा प्रारंभ तालुक्यात लवकरच होणार आहे. त्यासाठी पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाने कंबर कसली असून तालुक्यात सदर योजनेचा प्रारंभ २५ फेब्रुवारी रोजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील १३ गावांमध्ये नारळ वाढवून नवीन जळकुंभांचे भूमिपूजन संपन्न झाले. या योजनेमुळे २०२४ पर्यंत १२१ ग्रामपंचायतींमधील १९६ गावांच्या पाण्याची तहान भागणार आहे. या जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरास ५५ लिटर प्रतिमाणसे प्रमाणे पाणी वितरित केले जाणार आहे. त्यामुळे तालुक्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागातील आणि खेड्यापाड्यातील नागरिकांना या योजनेने दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

१९३ कामांचे कार्यादेश : या योजने अंतर्गत १९३ कामांचे कार्यादेश काढण्यात आले आहेत. तर ८६ कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून ४५ कामे जोमाने सुरू करणार असल्याचे पंचायत समिती भिवंडी पाणीपुरवठा विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे. तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही विविध जिल्ह्यांच्या तालुक्यातील ग्रामीण भागातून महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण मोदी सरकारच्या काळात तरी थांबणार का ? असा सवालही उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील १९३ कामांचे कार्यादेश काढण्यात आले आहेत. त्यापैकी ८६ कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून ४५ कामे वनविभागाच्या जागा, अंतर्गत जमीनीच्या अडचणी यामुळे रखडली आहेत, पुढच्या आठवड्यात कामे सुरू करण्याचे योजिले आहे. असे तालुका ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग उपअभियंता, विकास जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा - Mumbai Project Bhoomipujan : शांघाय नाही तर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मुंबई करायची आहे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.