ETV Bharat / state

पोळा विशेष : ठाण्यात मातीच्या बैलांची विक्री घटली, विक्रेत्यांवर आर्थिक संकट - ox idol sale decreased thane

काही प्रमाणात चीनी मातीच्या वस्तूंची विक्री होत असल्याचे सांगत मातीच्या बैलांचे सिंग हे फायबरचे असल्याने ते इतर राज्यातून, तसेच पुण्यातून आणून बैलांना लावण्यात येतात. मात्र त्यांच्याही किमती वाढल्याने मूर्ती विक्रीवर परिणाम झाला आहे.

बैल मूर्ती
बैल मूर्ती
author img

By

Published : Aug 17, 2020, 5:07 PM IST

ठाणे- लॉकडाऊनमुळे गेल्या ४ महिन्यापासून सर्वच धर्मियांच्या सणांवर परिणाम झाला आहे. बळीराजा साजरा करत असलेल्या बैलपोळा या सणावर देखील कोरोनाचे सावट आहे. कोरोनाकाळात मातीच्या बैलांची विक्री घटल्याने विक्रेत्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

माहिती देताना मूर्ती विक्रेता

गेल्या ५ महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीने राज्यासह ठाणे जिल्ह्यात थैमान घातले आहे. त्यातच केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केल्याने सर्वच उद्योग व्यवसाय ठप्प झाले होते. मात्र, गेल्या महिनाभरापासून अनलॉक घोषित केल्याने व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी पूर्वीसारखी ग्राहकांची खरेदीसाठीची रेलचेल कमीच असल्याचे व्यापारी सांगत आहे. त्यातच श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, दहीहंडी हे सण एकामागून एक निघून गेले. तोच पोळा सण उद्यावर येऊन ठेपला आहे. शेतकरी आपल्या बैलांना पोळ्याच्या दिवशी सजवून त्यांना नैवेद्य खायाला देतात व त्यांची पूजा करतात. तर काही गावकरी आणि शेतकरी घरीच मातीच्या बैलांची पूजा करून हा सण साजरा करतात. मात्र, यंदा पुजेला लागणाऱ्या मातीच्या रंगीबेरंगी बैलांची विक्री होत नसल्याचे लुंबाराम या विक्रेत्याने सांगितले आहे.

लुंबाराम हे मूळचे राजस्थानचे असून गेल्या १४ वर्षांपासून ते ठाणे जिल्ह्यातील पडघा-कल्याण मार्गाच्या कडेला झोपडी उभारून त्यामध्ये विविध प्रकारच्या मातीचे माठ, तसेच मातीच्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची विक्री करतात. मात्र, गेल्या ४ महिन्याच्या लॉकडाऊन कालावधीत मूर्तींची विक्री बंद होती. त्यामुळे, जवळचे होते नव्हते ते सर्व पैसे संपल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्या काळात त्यांनी गावाकडून पैसे मागून उदरनिर्वाह केल्याचे त्यांनी सांगितले.

आता मात्र काही प्रमाणात चीनीमातीच्या वस्तूंची विक्री होत असल्याचे सांगत मातीच्या बैलांचे सिंग हे फायबरचे असल्याने ते इतर राज्यातून तसेच पुण्यातून आणून या बैलांना लावण्यात येतात. मात्र, त्यांच्याही किमती वाढल्याने मूर्ती विक्रीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे, सध्या तरी इक्का दुक्का ग्राहकच मातीचे बैल खरेदी करण्यासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. किमान अडीचशे ते २ हजार पर्यंतचे मातीचे आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे बैले त्यांनी विक्रीसाठी ठेवले आहेत.

हेही वाचा- खळबळजनक! ज्यादा बिल आकारून रुग्णालयाने कोरोना मृतदेह धरला रोखून, ठाण्यातील प्रकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.