मीरा भाईंदर(ठाणे) - उत्तन परिसरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. उत्तन परिसरातील धावकी या ठिकाणी बंगल्यात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती परिमंडळ-१ उपायुक्त अमित काळे यांना मिळाली होती. स्पेशल टीमला पाठवून छापा टाकण्यात आला आहे. यामध्ये दोन महिला दलालासह चार पीडित मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे.
हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड -
मीरा भाईंदर शहरात अवैद्य धंद्यांवर जोरदार कारवाई सुरू आहे. शहरातील गुटखामाफिया, जुगाराचे अड्डे, स्पा पार्लर, अनैतिक कामावर पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केल्या आहेत. उत्तन परिसरातील धावकी या ठिकाणी एका बंगल्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांना खबऱ्यांमार्फत मिळाली. उपायुक्त अमित काळे यांनी संपूर्ण माहिती घेऊन टीम तयार केली आणि सोमवारी दुपारी सापळा रचून छापा टाकला असता घटनास्थळी सहा महिला आढळून आल्या. सदर कारवाईत नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे हे उपस्थित होते.
चार पीडित मुलींसह दोन महिला दलालांना अटक
सदर प्रकरणात चार पीडित मुलींमध्ये दोन मुली मॉडेल असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन महिला दलालासह चार पीडित मुलींना अटक करण्यात आली असून, दलाल महिलांवर पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चार पीडित मुलींना सुधारगृहात पाठवणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी ईटीव्ही भारतला दिली.