ETV Bharat / state

Thane Crime : भात शिजवला नसल्याच्या वादातून बायकोची हत्या; नवऱ्याला अटक

author img

By

Published : May 25, 2022, 7:42 PM IST

भात शिजवला नसल्याच्या कारणावरुन भिवंडीत ( Husband kills wifein Bhiwandi ) नवऱ्याने पत्नीची हत्या केली आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ( Nizampura Police ) ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी नवऱ्याला अटक केली आहे. शंकर वाघमारे (वय, २३) असे अटक केलेल्या नवऱ्याचे नाव आहे.

निजामपुरा पोलीस
निजामपुरा पोलीस

ठाणे - बायकोने केवळ भात शिजवला नसल्याच्या वादातून नवऱ्याने तिची हत्या ( Husband kills wifein Bhiwandi ) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी लगत असलेल्या खोणी गावातील एका चाळीत घडली आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ( Nizampura Police ) ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी नवऱ्याला अटक केली आहे. शंकर वाघमारे (वय, २३) असे अटक केलेल्या नवऱ्याचे नाव आहे. तर ज्योत्स्ना ( वय, २०) असे हत्या झालेल्या बायकोचे नाव आहे.

लाकडी दांडक्याने हत्या : आरोपी शंकर हा भंगार विक्रेता असून तो भिवंडी लगत असलेल्या खोणी गावातील बाळाराम चौधरी यांच्या चाळीत भाड्याने मृत पत्नीसोबत राहतो. त्याचे मृत ज्योत्स्नासोबत वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. त्यातच काल (मंगळवारी) रात्रीच्या जेवणात आरोपी नवऱ्याने भात शिजविण्यासाठी बायकोला सांगितले. मात्र तिने भात शिजवलाच नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला कि, नवऱ्याने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात, पाठीत पोटात बेदम मारहाण केली. या लाकडी दांडक्याच्या हल्ल्यात ती घरातच जमिनीवर पडल्याचे तिचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी त्याच्या घरात धाव घेतली. त्यावेळी बायको रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून नवऱ्याला शेजाऱ्यांनी पकडून ठेवले. त्यानंतर घटनेची माहिती निजामपुरा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस पथक दाखल गंभीर जखमी अवस्थेत बायकोला इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत्यू घोषित केले.

न्यायालयात हजर केले जाणार : या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस निरीक्षक अतुल लांबे यांनी सांगितले की, आरोपी मंगळवारी रात्रीच्या सुमारास घरी गेल्यावर त्याच्यासाठी बायकोला भात शिजविण्यासाठी सांगितले. यावरूनच दोघांमध्ये वाद होऊन जोरदार भांडण झाल्याने रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात, पोटात, पाठीच्या कण्यावर लाकडी दांडक्याने प्रहार केला. आरोपी नवऱ्याला मंगळवारी रात्री उशिरा अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहितीही तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अतुल लांबे यांनी दिली आहे.

हेही वाचा - Murder Of A Couple : पुंडलिकनगर भागात दाम्पत्याची हत्या, संशयाची सुई मुलावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.