ETV Bharat / state

Husband Murder Case: पती-पत्नीमध्ये झाला वाद; तीन मेहुण्यांनी मिळून केली पतीची हत्या, मृतदेह नदीत फेकला

मुलांना घेऊन जाताना दुसऱ्या पत्नीशी पतीने वाद घातल्याने तीन मेहुण्यांनी मिळून पतीची हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह नदीत फेकल्याचे पोलीस तपासात समोर आले. याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील खडकपाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून संशयित तिन्ही मेहुण्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इरशाद शेख, शोहेब शेख, हेमंत बिचवाडे असे ताब्यात घेतलेल्या मेहुण्यांची नावे आहेत. तर शेहबाज शेख (वय २६ वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

Husband Murder Case
मृतदेह नदीत फेकला
author img

By

Published : Aug 5, 2023, 11:02 PM IST

ठाणे: मिळालेल्या माहितीनुसार मृतक शेहबाज हा टिटवाळा नजीक बल्याणी गावात राहत होता. तर त्याची दुसरी पत्नी मुमताज शहाड भागातील बंदरपाडा परिसरात राहत आहे. मुमताज हिचा आधी निकाह झाला असून पहिल्या पतीपासून तिला तीन मुले आहेत. तर मृतक शेहबाज हा तिचा दुसरा पती होता. शेहबाजपासून मुमताजला दोन मुले झाली आहेत. हीच दोन मुले घेऊन जाण्यासाठी मृतक शेहबाज हा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुमताजच्या घरी आला; मात्र, मुले घेऊन जाण्यास मुमताजने विरोध केल्याने पती-पत्नीमध्ये वाद झाला. याच वादातून तीन मेहुण्यांनी मिळून शेहबाजला बेदम मारहाण करत हातोडीने प्रहार केले. यात त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात: यानंतर तिन्ही मेहुण्यांनी शेहबाजचा मृतदेह घराबाहेर खेचत आणत रिक्षात टाकला आणि नदीत फेकून दिला. विशेष म्हणजे, तीन मेहुण्यांमध्ये हेमंत बिचवाडे हा मुमताजच्या आई-वडिलांनी दत्तक घेतलेला मुलगा असल्याचे समोर आले. दरम्यान शुक्रवारी रात्री १० वाजल्याच्या सुमारास मुमताज ही पती बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी खडकपाडा पोलीस ठाण्यात आली होती. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेहबाज बेपत्ता असल्याची नोंद करून तपास सुरू केला. सायंकाळच्या सुमारास तीन मेहुण्यांनी मिळून केलेल्या बेदम मारहाणीत शेहबाजचा मृत्यू झाला. यानंतर त्याचा मृतदेह रिक्षातून नेऊन नदीत फेकल्याचे पोलिसांनी कळले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आज (शनिवारी) पहाटेच्या सुमारास तिघांना ताब्यात घेतले.

शेहबाजच्या मृतदेहाचा थांगपत्ता नाहीच: पोलिसांनी ताब्यात असलेल्या तीन मेहुण्याकडे चौकशी केली असता या तिघांनी शेहबाज शेख याला मारहाण केल्याची कबुली दिली. शेहबाजचा मृतदेह हा कल्याण मुरबाड रोडवरील पांजरपोळ नजीक नदीत फेकल्याचे सांगितले. खडकपाडा पोलीस अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने शेहबाजचा नदी पात्रात आज सकाळपासून शोध घेत आहेत; मात्र जवळपास आता २४ तास उलटून गेले. दुसरीकडे शेहबाजच्या मृतदेहाचा थांगपत्ता लागला नसून नदी पात्रात शोधकार्य सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिली आहे. तर या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी इरशाद शेख, सोयब शेख, हेमंत बिचवाडे या तिघांना ताब्यात घेतले आहे. ज्या रिक्षातून मृतदेह नेण्यात आला ती रिक्षाही पोलिसांनी जप्त केली. घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहितीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा:

  1. Bomb Blast Planning : देशातील अनेक ठिकाणी बॉम्बस्फोटाचा होता कट; पुण्यातील दहशतवाद्यांच्या चौकशीत मोठे खुलासे
  2. Thane Crime : शाळकरी मुलीवर अल्पवयीन विद्यार्थाकडून अत्याचार; पीडिता गर्भवती राहिल्याने घटना उघड
  3. Crime News : अमानुषतेचा कळस! मुलांना लघुशंका प्यायला लावत प्रायव्हेट पार्टवर मिरची लावली, Watch Video

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.