ETV Bharat / state

Widow Wife Gets Compensation : रोड अपघातात पतीचा मृत्यू, विधवा पत्नीला प्राधिकरणाद्वारे ६५.६२ लाखाची भरपाई - मृत संदेश शिंदे

रोड अपघातात पतीचा मृत्यू झालेल्या (Husband dies in road accident) विधवा पत्नीला प्राधिकरणाद्वारे ६५.६२ लाखाची भरपाई (65 Lakhs 62 Thousand Rupees by authority) देण्यात (widow wife gets compensation) आली. १८ मार्च, २०२० रोजी हा अपघात तुर्भे जवळ झाला होता. संदेश शिंदे असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव होते.

Widow Wife Gets Compensation
६५ लाख ६२ हजाराची भरपाई
author img

By

Published : Dec 13, 2022, 6:12 PM IST

ठाणे : भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार चालक संदेश शिंदे याचा रोड अपघातात मृत्यू (Husband dies in road accident) झाल्याची घटना १८ मार्च, २०२० रोजी, रात्री ९:३० वाजताच्या सुमारास घडली होती. सदरचे प्रकरण मोटार अपघात प्राधिकरणाकडे दाखल झाल्यानंतर मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य एच.एम. भोसले यांनी मृतक संदेश याची विधवा पत्नी आणि दोन मुलांना ६५ लाख ६२ हजार रुपयांची नुकसान भरपाई (widow wife gets compensation) देण्याचे आदेश (65 Lakhs 62 Thousand Rupees by authority) दिले. सदर भरपाई ट्रेलर मालक आणि नेशनल इन्शुरन्स कंपनीने संयुक्तपणे देण्याचा निकाल दिला.

मृतक संदेश शिंदे (३५) यांच्यामागे, पत्नी सुवर्णा संदेश शिंदे (३४), मुलगा प्रतीक (१३), आणि पार्थ (११) आणि आई सावित्री संजय शिंदे (५८) असा परिवार असून; ते सर्वजण एकत्रित कोपरखैरणे नवीमुंबई परिसरात राहतात. घटनेच्या दिवशी १८ मार्च, २०२० रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास मृतक संदेश शिंदे दुचाकीवर आपल्या मित्रासह कोपरखैरणे जाण्यासाठी निघाले असता, तुर्भे जवळ पेट्रोल पंप याठिकाणी एका भरधाव ट्रेलरने मागून दुचाकीला धडक दिली. यात मृतक संदेश आणि त्याच्या मित्राच्या अंगावरुन ट्रेलर गेला आणि त्यांचा मृत्यू झाला. मृतक संदेश शिंदे हे खाजगी कंपनीत नौकरीला होते. त्यांना महिन्याला ३२ हजार ६५५ रुपयांची मिळकत होती. असा युक्तीवाद शिंदे यांचे वकील एस.टी. कदम यांनी प्राधिकरणासमोर केला. प्राधिकरणाचे सदस्य एच.एम.भोसले यांनी प्राधिकरणासमोरील युक्तीवाद आणि साक्षीपुरावे तपासून नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि ट्रेलर मालक यांनी संयुक्तरित्या ६५ लाख ६२ हजार रुपयांची नुकसान भरपाई, दावा दाखल झाल्यापासून ८ टक्के व्याजाने देण्याचा निकाल दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.