ETV Bharat / state

ऐरोलीमध्ये घरफोडी; चोरट्यांनी चार लाखांचे सोने केले लंपास - ऐरोलीत चोरीच्या घटना

चोरट्यांनी घराच्या सेफ्टी दरवाजाला लावलेल्या कुलुपाचा कोयंडा कापलेला होता तर आतील लाकडी दरवाज्याचा लॅच लॉक देखील तोडले होते. बेडरूम मधील कपाटाचे लॉकर तोडून चोरट्यांनी सुमारे ४ लाख रुपयांच्या दागिन्यावर डल्ला मारला.

house breaking theft in new mumbai
चोरट्यांनी चार लाखांचे सोने केले लंपास
author img

By

Published : Mar 4, 2021, 7:22 AM IST

Updated : Mar 4, 2021, 7:56 AM IST

नवी मुंबई - ऐरोली सेक्टर ४ येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ४ लाख ८० हजार रुपये किमतीच्या सोन्यावर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रकाश शेट्टी असे घरमालकाचे नाव असून ते कामानिमित्त पुण्याला गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधून घरफोडी केली आहे.

चोरट्यांनी चार लाखांचे सोने केले लंपास
ऐरोली सेक्टर ४ येथील वर्षा सोसायटी येथे प्रकाश शेट्टी हे आपल्या सासू सोबत राहत आहेत. त्यांची पत्नी पुण्याला कामाला आहे. तर मागील तीन महिन्यापासून सासू गावाला गेल्या होत्या. यादरम्यान प्रकाश शेट्टी हे एकटेच घरामध्ये राहत होते. २३ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रकाश शेट्टी हे त्यांची पत्नी पौर्णिमा शेट्टी यांना भेटण्यासाठी पुण्याला गेले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरी केली. शेजाऱ्यांनी फोन करून दिली चोरीची माहिती-१ मार्च २०२१ ला घरामध्ये शेट्टी यांना चोरी झाली असल्याचे शेजाऱ्यांनी फोन करून सांगितले. चोरट्यांनी घराच्या सेफ्टी दरवाजाला लावलेल्या कुलुपाचा कोयंडा कापलेला होता तर आतील लाकडी दरवाज्याचे लॅच लॉक देखील तोडले होते. बेडरूम मधील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील १ सोन्याची चैन (४० ग्रॅम), १ सोन्याचे मंगळसूत्र (२० ग्रॅम), १ सोन्याचे ब्रेसलेट (२० ग्रॅम), सोन्याच्या ८ आंगठ्या (प्रत्येकी वजन ५ ग्रॅम) १ सोन्याची रुद्राक्ष माळ (४० ग्रॅम) असे एकूण सुमारे ४ लाख ८० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भांत रबाळे पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात प्रकाश शेट्टी यांचे नातेवाईक यांनी तक्रार दाखल केली आली आहे.संशयित चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद-या घरफोडीचे सीसीटीव्ही फुटेज काढले असून यामध्ये तीन व्यक्ती चोरी करताना आढळले आहेत. हा चोर संशयित आरोपी असून लवकरच त्यांना पकडण्यात रबाळे पोलिसांना यश मिळेल. तसेच रस्त्यावरील देखील सीसीटीव्ही जमा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Last Updated : Mar 4, 2021, 7:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.