ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन वाढल्यामुळे मंगल कार्यालये ओस पडली आहेत. ठाण्यातील अनेक भागात मंगल कार्यालय आणि हॉल यामध्ये अनेकांनी लग्न-कार्यासाठी केलेली बुकींग रद्द केली आहे. असेच चालत राहिले तर येणारे काही दिवस कठीण जाणार आल्याचे हॉटेल आणि मंगल कार्यालय व्यवसायिकांकडून बोलले जात आहे.
कोरोना विषाणूचा फटका शहरातील नामांकित हॉटेल्स आणि मंगल कार्यालयांना बसलेला आहे. यंदा मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान नामांकित हॉटेल्समध्ये लग्न समारंभ किंवा इतर सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रम होणार होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे परिस्थिती कठीण आहे. तर कोरोना असला तरी कामगारांचा पगार आणि सरकारचा कर, लाईट बिल भरावेच लागणार आहे. त्यामुळे हॉटेल मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.