नवी मुंबई - राज्यपाल-मुख्यमंत्री वादामध्ये हिंदुत्ववादी नेते अजय सिंह सेंगर यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे समर्थन केले आहे. तसेच, शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, हिंदुत्व शिकवण्याची खरी गरज भाजपला आहे, असेही करणी सेना अध्यक्ष अजयसिंह सेंगर म्हणाले आहेत. भाजपाला हिंदुत्वाची खरी व्याख्या समजली असती तर, त्यांनी समान नागरी कायदा आणला असता, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - मंदिरं बंद; उघडले बार…उद्धवा धुंद तुझे सरकार, भाजपाचे ‘लाक्षणिक उपोषण’
अटलबिहारी वाजपेयी 5 वर्षे पंतप्रधान होते. आता नरेंद्र मोदी 6 वर्षे पंतप्रधान आहेत. मग त्यांनी समान नागरी कायदा का नाही आणला, याचे उत्तर भाजपने प्रथम दयावे, असेही सेंगर यांनी म्हटले आहे. तसेच, हिंदुत्वासाठी पद्मावती सिनेमाविरुद्ध आंदोलन करणाऱ्या राजपूत, मराठ्यांच्याविरोधातील गुन्हे भाजपने मागे का नाही घेतले ? फक्त हिंदू मंदिरांचा पैसा का घेतला जातो? चर्च, मशिदींना पूर्ण स्वायत्तता का? याचेही उत्तर भाजपने द्यावे आणि मगच हिंदुत्वावर बोलावे, असे महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - गुरुकुंज मोझरीत तुकडोजी महाराजांच्या समाधी समोर भाजपचे आंदोलन, मंदिरे उघडण्याची मागणी