ठाणे - मुंबईसह ठाण्यात देखील तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव पाहायला मिळत आहे. काल रात्रीपासूनच ठाण्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. वादळामुळे अनेक झाडे उन्माळून पडली आहेत. ठाण्यात तेरा ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेमध्ये तीन ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले आहे.
नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन
दरम्यान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सुरक्ष यंत्रणा वाढवण्यात आली असून, ठाणे टीडीआरएफ टीमसोबत अग्निशामक दलाला देखील सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन ठाणे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ; वसई विरारमध्ये पावसाची हजेरी; प्रशासनाचा सर्तकतेचा इशारा