ठाणे - मुरबाड तालुक्यात पावसासह गरांच्या पावसाने अनेक गावांना झोडपून काढले. यात अनेक घरांचे नुकसान झाले. गेल्या दोन-चार दिवस ढगाळ वातावरण असल्याने जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर काल संध्याकाळच्या सुमारास पावसाने मुरबाड तालुक्यातील काही भागांत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे, वातावरण थोडे अल्हाददायक होऊन गारवा पसरला होता.
हेही वाचा - कल्याणच्या बेपत्ता तरुणीचे गूढ उकलेना; पोलिसही बुचकळ्यात
वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, रोगराईची शक्यता
मुरबाड तालुक्यात वैषखरे, मोहप, टोकावडे परिसरात घरांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले, तर दोन दिवसांपूर्वही अवकाळी पावसाने मोरोशी येथेही अनेक घरांचे नुकसान झाले. शिवाय काल वादळी वाऱ्यासह गरपीट झाल्याने बहुतांश घरांसह शेकडो एकर शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे, मुरबाड तहसीलदार यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर करून द्यावी, अशी मागणी तालुक्यातील गावांतील ग्रामस्थ उद्या करणार असल्याचे समजले.
पावसामुळे प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला. मात्र, अवकाळी पाऊस असल्याने पुन्हा उकाडा वाढून साथ, रोगराईची शक्यता गावकरी व्यक्त करत आहेत.
गरांच्या पावसाने शेतीसह घरांचे अधिक नुकसान
मुरबाड तालुक्यात शेवटचा टोक असलेल्या आल्याची वाडी, मेर्दी, मोधळवाडी, केळेवाडी, वाल्हीवरे, धारर्खिड, बांडेशेत या गावांना गारांच्या पावसाने झोडपून काढले. या गावांत भयानक गारपीठने घरांवरचे कौल व काचेच्या खिडक्या फुटून गेल्या. तर, दुसरीकडे मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले. उन्हाळी शेती करणारे आदिवासी बांधवाचे खुपच नुकसान झाले आहे.
हेही वाचा - अदर पूनावाला यांना धमकी कोणी दिली; जितेंद्र आव्हाड यांचा सवाल