ETV Bharat / state

Gun Firing At Early Moring : दिवाळीच्या तोंडावर पहाटे गोळीबार; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात चालले तरी काय? - latest news from Thane

मागील महिनाभराच्या कालावधीमध्ये ठाण्यात आज सकाळी दुसऱ्यांदा गोळीबार (Gun firing at Early morning in Thane city) झाला. या गोळीबारमध्ये तीन व्यावसायिक गंभीर जखमी (three businessman injured in Gun Firing Thane) असल्याचे समोर आले आहे. यावरून पोलिसांचा दरारा काहीसा कमी झाल्याचे चित्र ठाण्यात दिसते. ठाण्याचे नागपूर होऊ पाहतेय का ? असा प्रश्न उभा राहिला आहे. मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत आणि असे असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अपयशी झाल्याचे पाहायला मिळत आहे. (latest news from Thane), (Thane Crime)

Gun Firing At Early Moring
Gun Firing At Early Moring
author img

By

Published : Oct 21, 2022, 2:13 PM IST

ठाणे : मागील महिनाभराच्या कालावधीमध्ये ठाण्यात आज सकाळी दुसऱ्यांदा गोळीबार (Gun firing at Early morning in Thane city) झाला. या गोळीबारमध्ये तीन व्यावसायिक गंभीर जखमी (three businessman injured in Gun Firing Thane) असल्याचे समोर आले आहे. यावरून पोलिसांचा दरारा काहीसा कमी झाल्याचे चित्र ठाण्यात दिसते. ठाण्याचे नागपूर होऊ पाहतेय का ? असा प्रश्न उभा राहिला आहे. मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत आणि असे असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अपयशी झाल्याचे पाहायला मिळत आहे. (latest news from Thane), (Thane Crime)

ठाण्यातील गोळीबारीचे हेच ते ठिकाण

'हे' आहे खरे कारण- मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात दोन सख्खे मित्र; मात्र जेलमध्ये गेल्यानंतर माझ्याकडे का दुर्लक्ष केलं, या रागातून ठाण्याच्या लोकमान्य नगर परिसरामध्ये दुसरी गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात गंभीर झालेल्या हिस्ट्रीशीटर गणेश जाधव याला वेदांत रुग्णालयात डोक्यात गोळी लागल्याने दाखल करण्यात आले. आजच्या दिवसातली गोळीबाराची ही दुसरी घटना आहे.

आरोपींचा कसून शोध सुरू - ठाण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे दिवाळीच्या दिवशी उडाल्याचे पाहायला मिळाले आहे नौपाडा परिसरामध्ये पहाटे झालेल्या गोळीबारात तीन आरोपींनी चक्क दारूच्या नशेमध्ये अंदाधूंद सहा गोळ्या चालवल्या. ज्यामध्ये रस्त्यावरती कंदील बनवण्याचे काम करणार एक व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. तर गोळीबाराच्या दुसऱ्या घटनेमध्ये हिस्टरी शिटर गणेश जाधव उर्फ काळा गण्या हा मित्रानेच केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही गुन्ह्यानंतर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या टीम कामाला लागले आहे. आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.

ठाण्यात वाढल्या गोळीबाराच्या घटना : गेल्या अनेक दिवस शांत असलेले ठाणे हे आता पुन्हा गुन्हेगारी क्षेत्रात डोके वर काढताना दिसून येत आहे. ठाण्यात महाराष्ट्राचे मुख्य संविधानिक पदी अर्थात मुख्यमंत्री असताना देखील ठाण्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती ही वाढताना दिसून येते. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये मागील महिनाभरापासूनच आता हे दुसरे गोळीबाराचा प्रकरण आहे. त्यामुळे ठाण्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते का. असा सवाल आता स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण होतो. मुख्यमंत्रीपद जरी ठाण्याकडे असले तरी सुद्धा ठाणेकर नागरिक हे आता भयभीत अवस्थेत आहेत. येथील गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालते कोण, असा सवाल उपस्थित होतो आहे. मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारी क्षेत्रात ठाणे हे पुढे येत असून या गुन्हेगारी क्षेत्राला आळा कधी बसणार, असा सवाल आता ठाणेकर नागरिक मुख्यमंत्र्यांना विचारात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये महिलांची छेडछाड असेल किंवा गोळीबार प्रकरण असेल अशी प्रकरण दिवसेंदिवस वाढत जाताना दिसून येतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.