ETV Bharat / state

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना.. ठाणे पालिका रुग्णालयाचे १०० बेड "चाईल्ड कोरोना" म्हणून आरक्षित - कोरोना दुसरी लाट

ठाणे शहरात रुग्णांची संख्या कमी होत असल्याने पालिकेच्या हद्दीत दिलासादायक चित्र आहे. तसेच कोरोनावर मात करून घरी परतणाऱ्या रुग्णांचा आकडाही दिलासादायक आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सामना करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे. पालिके रुग्णालयाचे १०० बेट 'चाइल्ड कोरोना' म्हणून राखीव ठेवण्यात आले आहेत.

great-relief-to-the-children
great-relief-to-the-children
author img

By

Published : May 9, 2021, 11:47 PM IST

ठाणे - ठाणे पालिकेच्या हद्दीत दिलासादायक चित्र आहे. रुग्णांची संख्याही कमी होत आहे. तर कोरोनावर मात करून घरी परतणाऱ्या रुग्णांचा आकडाही दिलासा देणारा आहे. सहा दिवसात कोरोनाचे रुग्ण हजाराच्या आत आहे. मात्र येणाऱ्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या लाटेचा फटका लहान मुलांना बसण्याची शक्यता आहे. यासाठी पालिका प्रशासनाने पार्किंग प्लाझामध्ये अलिप्त १०० बेड "चाईल्ड कोरोना" म्हणून आरक्षित करणार असल्याचे ठाणे पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी सांगितले.

ठाणे पालिका रुग्णालयाचे १०० बेड "चाईल्ड कोरोना" म्हणून आरक्षित
ठाण्यात दुसऱ्या लाटेचा जबरदस्त तडाखा बसला. यात काही लहान मुलांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता आणि त्याचा फटका लहान मुलांना बसणार असल्याने प्रसंगावधान म्हणून ठाणे पालिकेच्या हद्दीत असलेले पार्किंग प्लाझा रुग्णालयात १०० सुसज्ज बेड हे "चाईल्ड कोरोना" म्हणून आरक्षित करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुलांच्या कोरोना उपचारात मोठी मदत होणार आहे. तिसऱ्या लाटेत मुलांना कोरोनाची बाधा झाल्यास पार्किंगमध्ये सरसकट मुलांवर उपचार केल्यास मुलांसाठी ते धोकादायक राहणार आहे. तर मोठी माणसे एकांकी असल्याने घाबरतात तर मुलांवर पार्किंगमध्ये एकांकी ठेवून उपचार करणे धोक्याचे आणि कठीण जाणार आहे. १०० बेड रुग्णालयात अलिप्त ठेवल्यास मुलांच्या देखभालीसाठी कुटुंबीयांतील एक व्यक्ती सोबत राहण्याची व्यवस्था केल्यानंतर मुलांच्या उपचारासाठी तैनात असलेल्या कर्मचारी यांचा ताण कमी होईल आणि मुले लवकर कोरोना मुक्त होतील.
लाटेच्या आधी तयारी -
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आणि लहान मुलांना फटका बसण्याच्या शक्यतेवर पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी चांगले पाऊल उचलत संकटापूर्वी केलेली उपायोजना ही ठाणेकर मुलांसाठी आणि कुटुंबीयांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.