ठाणे - भाजपा नेते नारायण राणे यांनी पुन्हा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले. शिवसेनेच्या राज्यात गुंडांच्या मिरवणुका निघतात मात्र साधुसंतांनी शिवजयंती मिरवणूक निर्बंध येतात, असा टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला. आगामी अर्थसंकल्पीय बजेटसाठी मुख्यमंत्री पिंजर्यातून बाहेर पडणार का, असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांना केला आहे.
महाविकास आघाडीच्या काळात महिला सुरक्षित नसून ठाकरे सरकार महिला सुरक्षिततेच्या बाबतीत कोणताच पाऊल उचलत नसल्याचा देखील आरोप नारायण राणे यांनी केला. शिवसेना सरकारमधील मंत्री हे खोटारडे असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला. तीन पक्षांचा सरकार हे आपल्या निर्णयावर ठाम राहू शकत नाही. त्यामुळेच त्यांना वारंवार घुमजाव करावा लागत असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली.
अधिवेशन आले की कोरोना वाढतो
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळ असताना राज्य सरकारसमोर असलेल्या अडचणी समोर येऊ नये म्हणून अधिवेशन गुंडाळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असते. म्हणूनच कोरोना वाढला असे राज्याचे नेते मंत्री सांगत असतात आणि यानिमित्ताने अधिवेशन गुंडाळण्याचा आरोप सरकार करत असल्याचा उल्लेख नारायण राणे यांनी केला.
हेही वाचा - दीराला खांद्यावर बसवून गर्भवती महिलेला करायला लावली ३ किमीची पायपीट, बॅटने केली मारहाण