ETV Bharat / state

बलात्कार करून तरुणीला लोकलमधून ढकलले; वाशी खाडीपुलावर जखमी अवस्थेत आढळली तरूणी - navi mumbai news

एका तरुणीला धावत्या लोकलमधुन वाशी खाडी पुलावर ढकलून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही तरुणी मंगळवारी सकाळी वाशी खाडी पुलावर रेल्वे रुळाजवळ जखमी अवस्थेत आढळली. तीच्यावर बलात्कार झाल्याचेही समोर आले आहे.

washi girl tried to kill by unknown
जखमी अवस्थेत आढळली तरुणी
author img

By

Published : Dec 26, 2020, 2:31 PM IST

नवी मुंबई - एका तरुणीला धावत्या लोकलमधुन वाशी खाडी पुलावर ढकलून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही तरुणी मंगळवारी सकाळी वाशी खाडी पुलावर रेल्वे रुळाजवळ जखमी अवस्थेत आढळली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासात सदर तरुणीवर बलात्कार झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार वाशी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

जखमी अवस्थेत आढळली तरुणी
पिडीत तरुणी टिटवाळा इथे राहात असून ती पवईत घरकाम करते. गेल्या शनिवारी ती टिटवाळयाला आईवडिलांना भेटायला गेली होती. टिटवाळ्याहून परतल्यानंतर मात्र तिचा कुटुंबियांशी संपर्क झाला नाही. मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास ही तरुणी वाशी खाडी पुलावर अप रेल्वे मार्गाच्या रुळालगत जखमी अवस्थेत मोटारमनला दिसली. मोटरमनने याबाबत स्टेशनमास्तरला माहिती दिली. त्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांना कळवले. पोलिसांनी आणि आरपीएफच्या जवानाने घटनास्थळी येऊन जखमी तरुणीला तत्काळ वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले.

पुढील उपचारासाठी जेजे रुग्णालयात हलवले
महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी या तरुणीवर प्रथमोपचार करुन तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले आहे. सध्या तरुणीची प्रकृती स्थिर आहे. मात्र ती बोलण्याच्या अवस्थेत नसल्याचे वाशी रेल्वे पोलिसांनी सांगितले. तरुणीच्या स्थितीत सुधार झाल्यानंतर तिच्यासोबत नेमके काय घडले, हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

अत्याचारही झाला
प्राथमिक तपासात या तरुणीवर बलात्कार झाल्याचे आढळले. मात्र फॉरेन्सिक अहवालानंतर या अत्याचाराबद्दल माहिती मिळेल. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न व बलात्कार या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष पथकाची नेमणूक
वाशी रेल्वे पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथक तयार केले आहे. या पथकाच्या माध्यमातून सर्व रेल्वे स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. तसेच तिच्या परिचितांची देखील चौकशी करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.